जिल्ह्यातील सरपंचपदांचे आरक्षण आज होणार जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:16 AM2020-12-08T04:16:38+5:302020-12-08T04:16:38+5:30
अकोला: जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण मंगळवार, ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांत ...
अकोला: जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण मंगळवार, ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांत सरपंचपदांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, लकवरच या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील सर्व ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतनिहाय सरपंचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणत्या ग्रामपंचायतचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होते, यासंदर्भात ग्रामस्थांसह इच्छुकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय
ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!
तालुका ग्रां.प.
अकोला ९७
अकोट ८४
बाळापूर ६६
बार्शीटाकळी ८०
मूर्तिजापूर ८६
पातूर ५७
तेल्हारा ६२
..........................................
एकूण ५३२
महिला सरपंचपदांची
आरक्षण सोडत ११ डिसेंबरला!
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांची आरक्षण सोडत ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात येणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी