अकोला: विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनानिमित्त २० डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल, तोष्णीवाल लेआउट, येथे नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालकुमार साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक व प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण घाटोळे उपस्थित होते.अकोला शहरातील स्कूल आॅफ स्कॉलर्स, जिजाऊ कन्या विद्यालय, बाल शिवाजी शाळा, प्रभात किड्स स्कूल, कोठारी कॉन्व्हेंट, हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंट, मुंगीलाल बाजोरिया कॉन्व्हेंट या शाळेतील ५० च्या वर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध संवाद व नाट्याभिनयाचे प्रात्याक्षिक सादर केले. स्पर्धेचे संचालन विशाखा जैन यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक अशोक ढेरे यांनी केले. या स्पर्धेमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्वच नाट्यछटांचे १ व २ डिसेंबर रोजी होणाºया बालकुमार साहित्य संमेलनातील विविध दालंनामध्ये सादरीकरण होईल. उत्कृष्ट नाट्यछटा सादर करणाºया विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.