खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:14 AM2021-06-29T04:14:24+5:302021-06-29T04:14:24+5:30
आगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, अनलॉक प्रक्रियेमध्ये बससेवा सुरू झाली;मात्र ...
आगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, अनलॉक प्रक्रियेमध्ये बससेवा सुरू झाली;मात्र काही भागात अद्यापही बससेवा पूर्ववत झाली नसल्याने प्रवाशांना प्रतीक्षा आहे. याचाच फायदा घेत आगर परिसरात खासगी वाहनचालकांकडून लूट सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बससेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
आगर परिसरात बससेवा सुरू न झाल्याने नागरिकांना शहरात ये-जा करताना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. कोरोनामुळे दळणवळण ठप्प झाले होते, तर शाळा महाविद्यालय बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक प्रक्रियेत बंद असलेली बससेवा सुरू करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत सुरू झाली नाही. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी शहराकडे धाव घेत आहेत. याचाच फायदा घेत खासगी वाहनचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करीत असून, आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे परिसरात बससेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.