एक्स्प्रेस फिडरच्या वाढीव कामाला सत्तापक्षाचा खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:04+5:302021-02-11T04:20:04+5:30

पहिल्याच वेळी निविदा मंजूर महान येथील जलशुध्दीकरण केंद्रात पीएसी पावडरचा पुरवठा करण्यासाठी जलप्रदाय विभागाने निविदा प्रसिध्द केली हाेती. पहिल्याच ...

The ruling party blames the increased work on the express feeder | एक्स्प्रेस फिडरच्या वाढीव कामाला सत्तापक्षाचा खाेडा

एक्स्प्रेस फिडरच्या वाढीव कामाला सत्तापक्षाचा खाेडा

Next

पहिल्याच वेळी निविदा मंजूर

महान येथील जलशुध्दीकरण केंद्रात पीएसी पावडरचा पुरवठा करण्यासाठी जलप्रदाय विभागाने निविदा प्रसिध्द केली हाेती. पहिल्याच वेळी तीन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले असता पार्श्व असाेसिएटसने ६ टक्के जादा दराने सादर केलेली निविदा सत्ताधारी भाजपने तडकाफडकी मंजूर केली. एकीकडे विद्युत विभागातील कामासाठी ७ वेळा निविदा प्रक्रिया राबवली जात असताना पार्श्व असाेसिएटसने सादर केलेल्या पहिल्याच निविदेला मंजुरी देण्याची घाई का, असा प्रश्न उपस्थित या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

भूमिगतचे काम रखडले

शिलाेडा येथे एक्स्प्रेस फिडरच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असतानाच अवघ्या ५३ लाखांच्या वाढीव कामाला बाजूला का सारण्यात आले,असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पडद्यामागील कारण काहीही असाे परंतु यामुळे भूमिगतचे काम रखडले,हे निश्चित आहे.

Web Title: The ruling party blames the increased work on the express feeder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.