लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अशोक वाटिकेत उभारलेल्या ४५ फुटाच्या शौर्य स्तंभाला आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सकाळी सलामी दिली. लॉर्ड बुद्ध फाउंडेशन, वंदना संघ, संघर्ष युथ व समता सैनिक दलाच्यावतीने हा सोहळा पार पडला. या सोहळयाचे उद्घाटन भदंत बी. संघपाल, भन्ते राहुल, भन्ते अश्वघोष यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे बाळासाहेब इंगोले, महार बटालियनचे इरभान तायडे, नीलाक्षी नरवाडे, नागपूर येथील प्रा.एन.व्ही. ढोके, भीमराव परघरमोल, गुणवंत देवपारे, महादेव तायडे, मनोरमा मेश्राम, माजी शिक्षणाधिकारी पी.जे. वानखडे, डॉ.एम.आर. इंगळे, यशवंत तिरपुडे, उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, राहुल बनसोड, महेंद्र डोंगरे, सुगत वाघमारे, देवचंद लबडे, सुभाष महाने, विनोद वीरघट, सुरेंद्र तिडके, संयोजक संजय डोंगरे, अशोक इंगोले, सतीश वानखडे, वंदना संघच्या सुनीता जाधव, रुक्मिणी इंगोले, गंगा गवई, विद्या सावळे उपस्थित होत्या.
अकोला : भीमा कोरेगाव विजयी स्तंभाला अशोक वाटिकेत सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:56 AM
अकोला : भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अशोक वाटिकेत उभारलेल्या ४५ फुटाच्या शौर्य स्तंभाला आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सकाळी सलामी दिली.
ठळक मुद्दे४५ फुटी प्रतीकात्मक शौर्य स्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले