अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतली अकोला जिल्ह्यातील विविध विभागांची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 03:12 PM2018-01-12T15:12:11+5:302018-01-12T15:15:30+5:30

अकोला : विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाºयांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाडाझडती घेतली.

Scheduled Caste Welfare Committee took revieve of Akola District's various departments! | अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतली अकोला जिल्ह्यातील विविध विभागांची झाडाझडती!

अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतली अकोला जिल्ह्यातील विविध विभागांची झाडाझडती!

googlenewsNext
ठळक मुद्देगत तीन दिवसांच्या जिल्हा दौºयांत भरती-बढती, आरक्षण, अनुशेषाचा घेतला आढावा.विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती १० जानेवारीपासून जिल्हा दौऱ्यावर आली आहे.

अकोला : विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाºयांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाडाझडती घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानरपालिका, नगर पालिका, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी -कर्मचाºयांची भरती-बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी आणि मागासवर्गीयांसाठी राबविण्यात येणाºया कल्याणकारी योजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती १० जानेवारीपासून तीन दिवसांच्या अकोला जिल्हा दौºयावर आली आहे. शुक्रवार, १२ जानेवारी रोजी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाºयांची भरती-बढती, आरक्षण, रिक्त जागांसह विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा अनुसूचित जाती कल्याण समितीने घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित विविध विभागप्रमुखांच्या बैठकीत गत तीन दिवसांच्या दौºयात आढळून आलेल्या विविध विभागातील त्रुटींचा आढावा समितीने घेतला. यावेळी अनुसूचित जाती कल्याण समितीप्रमुख आ. हरीश पिंपळे यांच्यासह समिती सदस्य आ. ज्ञानराज चौगुले, आ. गौतम चाबुकस्वार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, समिती अवर सचिव आनंद राहाटे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र जगदाळे तसेच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार आणि संबंधित विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Scheduled Caste Welfare Committee took revieve of Akola District's various departments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.