लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूची धडकी भरलेली असताना, अकोल्यात स्क्रब टायफसचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आहे. रुग्णावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.सध्या सर्वत्रच कोरोना विषाणूची चर्चा सुरू आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परराष्ट्रातून येणाºया प्रवासी भारतीयांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही नागरिकांमध्ये कोरोनाची भीती पसरली आहे. अशातच मूर्तिजापूर तालुक्यातील एका २२ वर्षीय युवकाला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारा हा कॅटरिंगचा व्यवसाय करतो.गावात त्याला झुडुपातील चिगर चावल्याने त्याची प्रकृती खालावली होती. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सोमवार, ९ मार्च रोजी त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आला.त्यामुळे त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात तत्काळ उपचार करण्यात आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थीर आहे.
रुग्णाच्या नातेवाइकांना औषधोपचाररुग्णाची वैद्यकीय चाचणी पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाच्या कुटुंबीयांना तीन दिवसांची प्रतिबंधात्मक औषधे दिली. शिवाय, तो ज्या भागात राहतो तेथील गवत आणि झुडुपांवर डीडीटी पावडरची फवारणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.