स्थानिक नेहरू पार्क येथे सवित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन अखिल भारतीय माळी महासंघ, महात्मा फुले समता परिषदच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बाेलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय महासचिव महादेवराव घोसे यांनी क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांचे विचार घराघरात पोहोचवून महिलांना अधिक सक्षम करणे काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी मनीष हिवराळे, प्रा. संतोष हुशे, उमेश मसने, माया इरतकार, प्रकाश दाते, माधुरी दाते यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले. प्रास्ताविक मनीष हिवराळे यांनी तर आभार प्रमोद ढोमणे यांनी केले. कार्यक्रमला वकील आघाडी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुरेश ढाकोलकर, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सुनील उंबरकर, सचिव विनोद पाटील इंगळे, श्रीकृष्ण बिडकर, उमेश मसने, प्रशांत फुलारी, वनिता राऊत, कल्पना तायडे, रामदास खंडारे, शंकरराव गिरे, प्रा. डॉ. नितीन देऊळकार, बाळकृष्ण काळपांडे, श्रीपद चोपडे, प्रवीण वाघमारे, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक आघाडी सुभाष राऊत, रमेश बोचरे, ज्ञानेश्वर बोदडे, पवन निखाडे, अनुप निखाडे, संतोष तायडे, ॲड प्रवीण करुले, अनंतराव गणोरकर, विजय गाडगे, आशीष हिवराळे, विजय इंगळे, प्रणव बंड, गोपाल भवाने, महेश भुसारी, अभिजित नंदरधने आणि अखिल भारतीय माळी महासंघ अकोलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सावित्रीमाई यांचे विचार घराघरात पाेहोचवा - घोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:16 AM