शेतकरी बचत गटामार्फत ग्राहकांना थेट टरबूज-खरबुजांची विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:48 AM2020-04-17T10:48:31+5:302020-04-17T10:49:07+5:30

मूर्तिजापूर शहर व आजूबाजूच्या परिसरात शेतमालाची विक्री करण्यात येत आहे.

Sell watermelon directly to consumers through Farmer Savings Group! | शेतकरी बचत गटामार्फत ग्राहकांना थेट टरबूज-खरबुजांची विक्री!

शेतकरी बचत गटामार्फत ग्राहकांना थेट टरबूज-खरबुजांची विक्री!

googlenewsNext

- संजय उमक 
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: ‘लॉकडाऊन’दरम्यान शेतातील तयार झालेल्या मालाची विक्री कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत होता. यावर काही बचत गटांच्या शेतकऱ्यांनी पर्याय शोधून काढला आणि टरबूज-खरबुजांचा माल थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याचा निर्णय घेतला. पोही येथील सरस्वती शेतमाल उत्पादक शेतकरी बचत गटामार्फत खरबूज-टरबुजाची थेट ग्राहकांना अल्प दरात विक्री करण्यात येत असल्याने बचत गटांनासुद्धा यातून चांगला फायदा होत आहे.
मूर्तिजापूर तालुक्यांतर्गत येणाºया अनेक गावांतील शेतकºयांनी शेतमाल उत्पादक गट तयार केले असून, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर व आजूबाजूच्या परिसरात शेतमालाची विक्री करण्यात येत आहे.
ग्राम पोही येथील सरस्वती शेतमाल उत्पादक बचत गटामार्फत ही विक्री होत असून, सिरसो, वडगाव-कुरूम, हातगाव, माटोडा, आमतवाडा, कंझरा व इतर ही गावांमध्ये शेतकरी बचत गट तयार करण्यात आले आहेत. यात महिला शेती शाळेचाही समावेश आहे. शेतात पिकविलेला माल बचत गटातील शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत रास्त भावात पोहोचविण्यात येत आहेत. विशेषत: या शेतमालात टरबूज आणि खरबूज या फळांचा समावेश आहे.
शहरातील मुख्य चौकात टरबूज, खरबूज तसेच भाजीपाल्याची रोज विक्री केल्या जात आहे. यातून वीस हजार रुपयांची शेतकºयांना मिळकत होत आहे.
कंझरा येथील शेतकरी जयेश देशमुख यांच्या सहा ते सात एकर शेतीमध्ये तसेच पोहीचे सदानंद नाईक यांच्या पाच एकर शेतीमध्ये टरबूज व खरबूज या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. यामधून ‘लॉकडाऊन’च्या काळात शेतकरी वर्ग ‘सोशल डिस्टन्स’चे भान राखून शासनाच्या निर्देशाचे पालन करून थेट ग्राहकांना आपल्या मालाची विक्री करीत ग्राहकांनाही ती परवडत असल्याने येथे मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विशेष म्हणजे, ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नियम पाळून विक्री केल्या जाते. या विक्री केंद्राला उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल गोरे व कृषी सहायक प्रशांत दशरथी यांनी भेट देऊन कौतुक केले.


सात एकर शेतामध्ये टरबूज, खरबुजाचे उत्पादन घेतले. संचारबंदी असल्याने माल कसा विकावा, हा प्रश्न होता; परंतु कृषी विभागाच्या सहकार्याने बचत गटाच्या माध्यमातून टरबूज, खरबुजाची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येत असल्याने फायदा झाला आहे.
-जयेश देशमुख,
शेतकरी, कंझरा.

Web Title: Sell watermelon directly to consumers through Farmer Savings Group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.