अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; भोंदूबाबासह दोघांना अटक
By admin | Published: September 12, 2016 10:27 PM2016-09-12T22:27:43+5:302016-09-12T22:27:43+5:30
तालुक्यातील जांभरुण येथील अल्पवयीन मुलीचे भोंदूबाबासह एकाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार १२ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.
Next
style="text-align: justify;">निशांत गवई, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १२ - तालुक्यातील जांभरुण येथील अल्पवयीन मुलीचे भोंदूबाबासह एकाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार १२ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून भोंदूबाबासह एकास अटक केली आहे.
जांभरुण येथील अल्पवयीन मुलगी परभणी येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेते. या मुलीला कथित महाराज राजेश्वर कृष्णराव पोन्नालवार रा. जांभरुण व त्याचा सहकारी विलास जाधव रा. बाभुळगाव यांनी जडीबुटी व मंत्रोपचाराच्या मदतीने फूस लावून पळविले.
त्या मुलीच्या आई-वडिलांनी पातूर पोलिसात धाव घेऊन त्या मुलीची सुटका करण्याची मागणी केली होती. पातूर पोलिसांनी या मुलीची सुटका करून त्याला आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी महाराज राजेश्वर पोन्नालवार व विलास जाधव यांच्याविरुद्ध कलम ३६३,३६१,३७६, +३४ भादंवि, पास्को कायदा ३,४, महाराष्ट्र नरबळी व इतर अधिनियम, जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायदा ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ठाणेदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पातूर पोलिसांनी जांभरुणच्या कथित महाराजाला १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ठाण्यात बोलावले होते. तो महाराज ठाण्यात एकटा न येता अकोल्यातील तृतीयपंंथीयांनाही सोबत घेऊन आला. तृतीयपंथीयांनी पोलीस ठाण्याच्या आवारात जोरजोरात ओरडणे, पोलिसांना शिवीगाळ करणे तसेच आपल्या अंगावरील कपडे काढून फेकणे असा धिंगाणा सुरू क रून ठाणेदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. दीड तासानंतर हेकाँ सोहेल खान, सदानंद व्यवहारे यांनी या तृतीयपंथीयांची समजूत काढून त्यांना पोलीस ठाण्याच्या बाहेर काढून अकोल्यास रवाना केले.
पोन्नालवारने जमवली लाखोंची माया
जांभरुण येथे महाराज असलेल्या राजेश्वर पोन्नालवार याने जादूटोणा दाखवून अगडबंब संपत्ती गोळा केली आहे. त्याचा दर मंगळवारी गावात दरबार भरत असतो. त्या ठिकाणी दूर दूरवरून नागरिक येतात. दर पौर्णिमा व अमावस्येच्या दिवशी तृतीयपंथी या ठिकाणी येत असल्याची माहिती गावातील ग्रामस्थांनी दिली. पोन्नालवार हा नागरिकांना पोलीस आपले भक्त असून माझ्या फोटोचे दर्शन घेतल्याशिवाय कुठलेच काम करीत नसल्याच्या भूलथापा देत होता.