अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या तसेच एका खासगी बँकेत अधिकारी म्हणूण कार्यरत असलेल्या जयप्रकाश नारायण गावंडे या नराधमाने लहाण मुलांना चॉकलेट देण्याचे आमीष देउन त्यांचा लैंगीक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आला. या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीस बेडया ठोकल्या असून त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.जयप्रकाश नारायण गावंडे (५३) हा या ठिकाणी रहिवासी असून या खासगी बँकेत नोकरीला आहे. दररोज सायंकाळी बँकेतून घरी गेल्यानंतर याच परिसरातील इयत्ता सातवी ते आठव्या वर्गात शिकणाºया मुलांना ते शाळेतून घरी आल्यानंतर तो त्याच्या घरी बोलवायचा. पीडित मुलांना चॉकलेट देण्याच्या आमीषाने तसेच पैसे देण्याच्या कारणावरुन आरोपी त्यांना सुटीच्या दिवशी दुपारी तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायंकाळी घरी बोलवायचा. त्यानंतर या मुलांसोबत अश्लील चाळे करीत होता. १९ फेब्रुवारी रोजी या तीन मुलांमधील एका पिडीत मुलाचे आजोबा सदर बँक अधिकाºयाच्या घराकडे गेले असता आरोपीच्या रूममध्ये काही मुले आरोपी सोबत झोपलेल्या अवस्थेत दिसले. या संदर्भात त्यांनी बँक अधिकाºयास जाब विचारला असता मुलांना वाईट उद्देशाने बोलत नसून त्यांना चॉकलेट किंवा इतर काही वस्तू खाण्यासाठी देत असल्याचा खुलासा आरोपीने केला. एवढेच नव्हे तर उलट मुजोरी करीत मुलाच्या आजोबासोबतच त्याने हुज्जत घातली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलांच्या नातेवाईकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. अखेर या मुलांच्या पालकांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घडलेला घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीयार्ने घेतले. सिव्हील लाईन्स पोलिसांनी पीडित मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून आरोपी जयप्रकाश नारायण गावंडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७७ पोस्को (लहान मुलांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा ) नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस बेडया ठोकल्यानंतर शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस ८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पिडीतांमध्ये मुलीहीदरम्यान जयप्रकाश नारायण गावंडे याने तीन मुलांसोबतच काही मुलींचेही लैंगीक शोषन केल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात पिडीतांची संख्या वाढण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.