पेट्राेल, घरगुती गॅस दरवाढविराेधात शिवसेनेचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:57+5:302021-06-27T04:13:57+5:30
केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढविल्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर झाला असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचे दर महागले आहेत. गरीब ...
केंद्र सरकारने इंधनाचे दर वाढविल्याचा परिणाम दळणवळण व्यवस्थेवर झाला असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचे दर महागले आहेत. गरीब नागरिकांना सबसीडीच्या नावाखाली चढ्या दराने घरगुती गॅस सिलिंडर दिले जात असल्याचा आराेप करीत सेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा (अकाेला पश्चिम)यांनी केंद्र शासनाविराेधात आंदाेलनाचे हत्यार उपसले. शनिवारी प्रभाग क्रमांक-१०च्या नगरसेविका मंजूषा शेळके, अनिल परचुरे, रूपेश फाटे, याेगेश गिते, बबलू उके, अश्विन नवले यांनी जय हिंद चाैकात घंटानाद आंदाेलनाचे आयाेजन केले. यावेळी नगरसेविका अनिता मिश्रा, प्रमिला गिते, सपना नवले, नीलिमा तिजारे, रूपाली बर्डे, मीरा तायडे, गीता चव्हाण, शिल्पा चव्हाण, शीतल वैष्णव, रंजना हरणे, वंदना विसपुते, मंजू चांदवडकर, मंदा कीर्तिवार, शुभांगी किनगे, वर्षा पिसाेडे, सुनीता श्रीवास, शहर प्रमुख अतुल पवनिकर (अकाेला पूर्व), नगरसेवक गजानन चव्हाण, संताेष अनासने, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, युवासेना शहर प्रमुख नितीन मिश्रा, दिनेश सराेदे, देवा गावंडे, संताेष रणपिसे, सागर कुकडे, राजू भिसे, राेशन राज, सुनील दुर्गिया अभय नागापुरे, साेनू गायकवाड, गणेश बुंदेले यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित हाेते.
फोटो: