--------------------------------------
पणज येथे शिवजयंती साजरी
पणज: आकोट तालुक्यातील पणज येथे ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात त्यानंतर जयभवानी गणेशोत्सव मंडळ, भवानी क्रीडा मंडळ, धम्म सागर ज्ञान प्रसारक मंडळ, जि.प. प्रा. मराठी शाळेत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-----------------------------
खिरपुरी बु. येथे शिवजयंती उत्साहात
खिरपुरी बु. : येथील माळी समाज बांधवांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गनगणे, प्रमुख उपस्थिती अरुण चिंचोळकार, गोविंदराव धनोकार, संतोष हाडोळे होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन मसने यांनी तर आभार प्रकाश मसने यांनी मानले.
-----------------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शिवजयंती उत्साहात
पातूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इद्दुभाई, श्रीकृष्ण बोंबटकार, सपना राऊत, ग्रा. पं. सदस्य फिरोज खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले.
------------------------------------------
दोनवाडा येथे अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन
दोनवाडा: दहीहंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश दिनकर रावजी गावंडे यांच्या संकल्पनेतून दोनवाडा येथे पंचशील विहारात अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक विजय मुंडे, संतोष चव्हाण, श्रीकृष्ण झटाले, गोपाल बचे, हरिदास झटाले, मोहन झटाले, अनंता झटाले आदी उपस्थित होते.
-------------------------------------------
टाकळी खुरेशी- नांदखेड रस्त्याची दयनीय अवस्था
बाळापूर: तालुक्यातील टाकळी खुरेशी- नांदखेड रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गत काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. सध्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
-----------------------------
हरभरा सोंगणीची लगबग
म्हातोडी: परिसरातील खरप बु., घुसर, म्हातोडी, घुसरवाडी शिवारात हरभरा सोंगणीला वेग आला आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी हरभरा सोंगणी सुरू केली आहे. परिसरात मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
----------------------------
वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी चिंतित
वाडेगाव : परिसरातील दिग्रस बु. शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी चिंतित सापडले आहेत. याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
-----------------------
कुंभारी येथे क्रिकेट सामने
अकोला: शिवबा क्रिकेट क्लब कुंभारी यांच्या विद्यमाने सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १७ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत बी. पी. एड. कॉलेज कुंभारी येथे करण्यात आले होते. या चषकाचा बक्षीस वितरण सोहळा १९ फेब्रुवारी रोजी पार पडला.