सामाजिक बांधीलकी : कर्मचाऱ्यांना मार्चमध्येच दिला एप्रिलचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:19 PM2020-03-22T18:19:46+5:302020-03-22T18:20:13+5:30
राजू फाटे यांचा हा पुढाकार उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.
- सचिन राऊत
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत अकोल्यातील ओम नम: शिवाय इलेक्ट्रिकल्स आणि अनुष्का इंडस्ट्रीजचे संचालक राजू फाटे यांनी त्यांच्या कर्मचाºयांसह कामगारांना एप्रिल महिन्याचे वेतन आधीच देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा परिचय करून दिला.
कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासन गंभीर आहे. उपाययोजना म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे; मात्र बंद तसेच कामकाज कमी होत असल्याने बेरोजगारी तसेच काहींचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक व्यापारी व उद्योजक यांनी त्यांच्या कर्मचाºयांना कामगारांना एक महिन्याचा पगार देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत त्यांच्या कर्मचाºयांना एप्रिल महिन्याचे वेतन आधीच दिले. यासोबतच त्यांच्या कामगारांच्या कामाचे तासही कमी करण्यात आली असून, त्यांना आळी-पाळीने काम देऊन कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राजू फाटे यांचा हा पुढाकार उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.
पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजक, व्यापाºयांना त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व कामगारांच्या कुटुंबीयांची काळजी म्हणून त्यांना वेतन देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला ओम नम: शिवाय इलेक्ट्रिकल्स व अनुष्का इंडस्ट्रीजचे संचालक प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत त्यांच्या दोन्ही प्रतिष्ठानातील कर्मचाºयांना एक महिन्याचे वेतन आधीच दिले. यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन त्यांच्या कामगारांना उघड्यावर न सोडता एक महिन्याचे वेतन देण्याचे आवाहनही फाटे यांनी केले.
कोरोना या गंभीर आजाराचे संशयित अकोल्यातही असल्याने धोका वाढला आहे. शासन-प्रशासन खबरदारी घेत असून, आपलेही सामाजिक कर्तव्य म्हणून कोरोनाला आळा घालण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ओम नमो शिवाय इलेक्ट्रिकल्स आणि अनुष्का इंडस्ट्रिजमधील कर्मचाºयांना आधीच वेतन देण्यात आले आहे.
प्रदीप उर्फ राजू फाटे
अध्यक्ष ईसीए, संचालक, अनुष्का इंडस्ट्रीज