शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार : किरण सरनाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:14 AM2021-01-01T04:14:02+5:302021-01-01T04:14:02+5:30
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्क्याने ॲड. आमदार किरणराव सरनाईक यांची निवड झाली. यानंतर तेल्हारानगरीत त्यांच्या ...
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्क्याने ॲड. आमदार किरणराव सरनाईक यांची निवड झाली. यानंतर तेल्हारानगरीत त्यांच्या प्रथम आगमनानिमित्त अमरावती विभागीय शिक्षकसंघ तालुका तेल्हाराच्या वतीने तालुका कार्यकारिणीच्या वतीने सत्काराचे आयोजन सेठ बन्सीधर हायस्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आमदार किरण सरनाईक यांनी शिक्षकांच्या समस्या साेडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले विशेषत अनुदान वितरण, 2005 पूर्वी व नंतर सेवेत रुजू झालेले कर्मचारी यांना पेन्शन मिळणे या समस्यांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अण्णासाहेब ढोले सुधीर देशमुख, सेठ बन्सीधर शाळेचे प्राचार्य राजेंद्र देशमुख, पद्मावती टिकार, मोहम्मद ईसाक अब्दुल गणी, गोपाळराव खेडकरचे प्राचार्य डॉ, गोपाल ढोले, श्याम भोपळे, भय्यासाहेब देशमुख, नयनाताई मनतकार, डॉ.अशोक बिहाडे, राजेश घायाळ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष विजय वानखडे, सुरेश झामरे, निळकंठ सानप, प्रमोद देऊळकार, बाळापुरे अभ्यंकर, जयप्रकाश इंगळे, पी. पी. राठोड, येऊल, पखाले, बानेरकर, इंगळे, काकड, सोयाम यांसह अनेकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोनीकर यांनी केले, तर आभार विजय वानखडे यांनी मानले.