खेळाडूंना मिळणार क्रीडा सवलतीचे वाढीव गुण
By Admin | Published: April 27, 2017 01:13 AM2017-04-27T01:13:44+5:302017-04-27T01:13:44+5:30
अकोला : एकविध खेळ क्रीडा संघटनेमार्फत झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे.
अकोला : एकविध खेळ क्रीडा संघटनेमार्फत झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त सहभागी झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा सन २०१६-१७ मध्ये प्रविष्ट झालेल्या नियमित खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे.
यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी २५ एप्रिल रोजी क्रीडा सवलतीचे गुण ज्या खेळ प्रकारांना मिळणार आहे, अशा खेळ क्रीडा संघटनेची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न एकविध खेळ संघटना एकूण ३१ आहेत, तसेच महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनशी संलग्न एकविध खेळ संघटनादेखील ३१ आहेत.
यामध्ये आर्चरी, अॅथलेक्सि, अॅक्वाटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॅण्डबॉल ज्युडो, कबड्डी, खो-खो, लॉन टेनिस, रायफल, टेबल-टेनिस, ट्रायथलॉन, तायकांदो, व्हॉलीबॉल, रेसलिंग, वेटलिफ्टिंग, कयाकिंग अॅण्ड कॅनोईग, फेन्सिंग, वुशू, मॉडर्न पेटॅथलॉन, इक्वेस्टेरियन, नेटबॉल, रग्बी, स्क्वॅश,रोइंग, स्क्वॅश रॅकेटस, स्वीमिंग, टेनिस, हॉकी या खेळांचा समावेश आहे. या खेळांमध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात येणार आहे.
क्रीडा सवलतीच्या गुणांचा लाभ खेळाडू विद्यार्थ्यांना होण्याकरिता जिल्ह्यातील विद्यालय-महाविद्यालयाचे प्राचार्य-मुख्याध्यापक यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे तत्काळ सादर करणे आवश्यक आहे.
- शेखर पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी.