डम्पिंग ग्राउंडवर साचले पाणी ; जेसीबी नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:37+5:302021-09-08T04:24:37+5:30
महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्यामुळेच घनकचरा व्यवस्थापनाच्या ४५ काेटींच्या प्रकल्पाला ग्रहण लागले आहे. काेणत्याही कामाच्या देयकातून दाेन पैसे ...
महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्यामुळेच घनकचरा व्यवस्थापनाच्या ४५ काेटींच्या प्रकल्पाला ग्रहण लागले आहे. काेणत्याही कामाच्या देयकातून दाेन पैसे खिशात टाकण्याच्या सवयीमुळे वरिष्ठांना चुकीची माहिती दिली जाते. त्याचे परिणाम सर्वसामान्य अकाेलेकरांना भाेगावे लागतात. नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याची रीतसर विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात साेमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने व जेसीबी नादुरुस्त झाल्याने भर पडली. कचरा साठवणुकीसाठी जागाच शिल्लक नसल्याने घंटागाडी चालकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागले.
शहरात कचऱ्याचे ढीग
मनपा आयुक्तांनी भाडेतत्त्वावरील ३२ ट्रॅक्टरचा करार रद्द करीत मनपाच्या मालकीचे १६ ट्रॅक्टर कामाला लावले. प्रत्येक झाेनसाठी ४ ट्रॅक्टर व एक टिप्पर अशा वाहनांची साेय करुन देत त्यावर कुली असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. यातील अनेक कुली कामाच्या ठिकाणी नियुक्त झाले असले तरी प्रत्यक्षात कचरा उचलण्यासाठी ते हजर राहत नसल्याची माहिती आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.