अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 05:44 PM2019-02-12T17:44:21+5:302019-02-12T17:44:45+5:30

तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Start of Agriculture, Grain Festival in Akola | अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

अकोल्यात कृषी, धान्य महोत्सवाला प्रारंभ  

Next

अकोला : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीचा धान्य महोत्सव उपक्रम स्तूत्य असून, शेतकरी,महिला बचत गटांसाठी महत्वाचे दालन असल्याचे प्रतिपादन अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)यंत्रणा, कृषी विभाग,पणन मंडळ व कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने १२ ते १४ फेब्रुवारीपर्यंतच तीन दिवसीय आयोजित धान्य महोत्सवाचे उदघाटन शासनाचा कृषी पूरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी सैयद खुर्शीद सै. हाशम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपिठावर कृषी किर्तनकार महादेवराव भुईभार,डॉ.पंदेकृविचे संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी अरू ण वाघमारे,निळकंठ खेळकर,बालाजी किरवले आदींची उपस्थिती होती.
धोत्रे यांनी यावेळी शेतकºयांनी जोडधंदा करावा,यासाठीचे मार्गदर्शन करण्याची गरज असल्याने तीन दिवस चालणाºया महोत्सवात पशू,कुक्कु टपालन,आधुनिक शेतीची माहिती मिळण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.लोकनेत वसंतराव धोत्रे यांच्या जंयतीनिमित्त शेतकºयांचे येथे प्रबोधन व शास्त्रशुध्द माहिती तज्ज्ञाकडून दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
डॉ.खर्चे यांनी बदलत्या हवामानात आता हवामानाकुल पिके घेण्याची गरज असल्याचे सांगितले.कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल तंत्रज्ञान,संशोधन वापरण्याचे आवाहन करताना धान्य,कृषी महोत्सव शेतकरी, बचत गटांसाठी महत्वाचे दालन असल्याचे सांगितले.

Web Title: Start of Agriculture, Grain Festival in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.