पेरण्या सुरू; पण ९२ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:11 AM2020-06-22T10:11:50+5:302020-06-22T10:11:57+5:30

केवळ ४९ हजार ५२२ शेतकऱ्यांना ४२३ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Start sowing; But 92,000 farmers are deprived of crop loans | पेरण्या सुरू; पण ९२ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित

पेरण्या सुरू; पण ९२ हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित

googlenewsNext

- संतोष येलकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट असले तरी, २० जूनपर्यंत जिल्ह्यातील केवळ ४९ हजार ५२२ शेतकऱ्यांना ४२३ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू झाल्या असताना उर्वरित ९२ हजार ९७८ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नसल्याने, पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर दरवर्षी १ एप्रिलपासून सुरू होणारे पीक कर्जाचे वाटप यावर्षी २८ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत २० जूनपर्यंत जिल्ह्यातील ४९ हजार ५२२ शेतकºयांना ४२३ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज बँकांमार्फत वाटप करण्यात आले असून, उर्वरित जिल्ह्यातील ९२ हजार ९७८ शेतकºयांना अद्याप पीक कर्ज मिळाले नाही. जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू झाल्या असून, अडचणीत असलेल्या शेतकºयांना बियाणे-खते व पेरणीचा खर्च भागविण्यासाठी पीक कर्जाचा लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा; जिल्हाधिकाºयांचे बँकांना निर्देश!
जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील बँक अधिकाºयांच्या बैठकीत घेतला. शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी बँकांच्या अधिकाºयांना या बैठकीत दिले.

खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याचे काम बँकांमार्फत सुरू असून, २० जूनपर्यंत जिल्ह्यात ४९ हजार ५२२ शेतकºयांना ४२३ कोटी ८७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
- आलोक तारेनिया
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

 

Web Title: Start sowing; But 92,000 farmers are deprived of crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.