कृषी कायद्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:18 AM2021-03-06T04:18:44+5:302021-03-06T04:18:44+5:30
शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. परंतु सरकार यावर कोणताही निर्णय घेत नाही. ...
शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. परंतु सरकार यावर कोणताही निर्णय घेत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व शेतकरी विरोधी झालेले काळे कायदे रद्द होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत असल्याचे निवेदनात नमूद केले. सदर निवेदन
वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुका अध्यक्ष संदीप आग्रे, महिला आघाडी अध्यक्ष सुनीता हेरोळे, मंगला तेलगोटे, महासचिव जयश्री तेलगोटे, लताताई नितोने, नीलेश झाडे, रामकृष्ण मिसाळ, शहर महासचिव मो. जमील जम्मुपटेल, राजकुमार दामोदर नुरूज़्ज़मा, मयूर सपकाळ, धीरज सिरसाठ, गौतम पचांग, प्रशांत मानकर अक्षय तेलगोटे, अमोल वानखडे, रवी नारायण म्हेसने, सुरेश राऊत, गोपाल ओइम्बे, अमोल अकोटकर, दिनेश वानखडे, भाऊराव धांडे, चरण इंगळे, रोहित धांडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो: