- बबन इंगळेसायखेड : पाणीटंचाईने होरपळणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील वरखेड (देवदरी) व पुनोती बु. या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना या ठिकाणी हरताळ फासला जात असल्याचे रविवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. पाणी पुरवठा करणारा टँकर चक्क बेवारस स्थितीत आढळून आल्याने पाणी पुरवठा किती प्रामाणिकपणे होत असेल, यावर शंका उपस्थित होत आहे.वरखेड देवदरी येथे ज्या दोन विहिरीत पाणी टँकरद्वारे सोडले जाते, त्या दोन्हीही विहिरी अस्वच्छ असून, त्यामध्ये घाण व कचरा दिसून आला. कोथळी बु. येथील अंकुशकर या शेतकºयाच्या शेतात असलेल्या बोअरवेलमधील पाणी टँकरमध्ये भरल्या जाते. गंभीर बाब म्हणजे, या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नाही. हा टँकर भरताना कोणताही जबाबदार व्यक्ती नसतो. कृ षी पंपाच्या भारनियमनाचे वेळापत्रक लक्षात घेऊन पाण्याचा टँकरने पुरवठा होतो. वरखेड देवदरी येथे जाणारा टँकर हा पाण्याने भरलेल्या स्थितीत कोथळी बु. येथील सिद्धेश्वर संस्थान परिसरात बेवारस उभा असल्याचे या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान दिसून आले. अस्वच्छ विहिरीत ब्लिचिंग पावडर न टाकता टँकरचे पाणी सोडल्या जात असल्याने हे पाणी ७५ टक्के ग्रामस्थ फक्त वापरण्यासाठी व धुणी-भांडी यासाठी उपयोगात आणत असल्याचे चित्र दिसले.दोन्ही टँकरमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा नाही!पाणी पुरवठा करणारे पुनोती बु. व वरखेड देवदरी येथील टँकरच्या कॅबीनमध्ये पाहिले असता जीपीएस यंत्र नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे टँकर दिवसातून किती वेळा पाणी नेते व कोणत्या वेळी हे समजत नाही. नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या लॉगबुकबाबत टँकर चालकास विचारले असता एकाचे लॉगबुक घरी राहिले तर दुसºयाचे पं.स.च्या लिपिकाकडे असल्याचे उत्तर मिळाले.पालकमंत्र्यांच्या निर्देशाची ऐशीतैशीगेल्या आठवड्यात पुनोती बु. येथे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी पापळकर यांनी येऊन पाणीपुरवठा करणाºया टँकरची पाहणी केली व टँकरचे पाणी ग्रा. पं. समोर असलेल्या विहिरीत सोडण्याचे निर्देश दिले होते. प्रत्यक्षात मात्र दुसºया विहिरीत पाणी सोडण्यात येते. ज्या कुटुंबाकडे पाणी साठविण्यासाठी टाक्या आहेत, त्यांच्या टाक्या गल्लोगल्ली जाऊन टँकरने भरून दिल्या जातात. कसेही का होईना, पण ग्रामस्थांना टँकरचे पाणी मिळत असल्याने येथे पाण्यासाठी ओरड दिसून आली नाही.असे केले स्टिंग आॅपरेशन.....सकाळी ७.५० वाजता वरखेड देवदरी येथे जाऊन दोन्ही विहिरींची पाहणी केली. त्यामध्ये कचरा, घाण व अस्वच्छता दिसली.टँकरने अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे समजताच ज्या ठिकाणावरून टँकरमध्ये पाणी भरल्या जाते तेथे कोथळी बु. येथे जाऊन टँकर भरून उभा असल्याचे दिसले. चालक आज येणार नसल्याचे सांगण्यात आले; परंतु लोकमत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता चालक अकोला खडकी येथून निघाल्याचे समजले.पुनोती बु. येथे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर टँकर रस्त्यावर रिकाम्या टाक्यांमध्ये पाणी भरताना आढळला. चालकास विचारणा केली असता विहिरीत पाणी सोडल्यावर उर्वरित पाणी रस्त्याने कुटुंबाच्या दारी असलेल्या टाक्यात टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.वरखेड देवदरी येथील दोन्ही विहिरी अस्वच्छ असून, त्यातील टँकरने सोडलेल्या पाण्याचा वापर नळ कनेक्शन नसलेले ग्रामस्थ पिण्यासाठी करतात. खासगी नळ कनेक्शन असलेले ग्रामस्थ टँकरचे पाणी पिण्यासाठी वापरत नाहीत.रामेश्वर राठोड, ग्रामस्थ, देवदरीविहिरीतील पाण्यात ब्लिचिंग नसल्याने साथीच्या आजाराची शक्यता आहे. आमच्याकडे खासगी नळ कनेक्शन नसल्याने नाइलाजाने हे पाणी प्यावे लागते.- रेणुका संजय जाधव, ग्रामस्थ, देवदरी वरखेडआम्ही ज्या विहिरीवरून पाणी भरतो त्यात टँकरचे पाणी सोडल्या जात नाही. टँकर आला की गावातील गल्लोगल्लीत पाणी वाटत फिरतो.- भगवान मोहोड, पुनोती