अकोला : शहरातील लकडगंज परिसरातील राजेश्वर सॉ मिल येथे बिनारहदारी पासने वाहतूक करण्यात आलेला आडजात बेहेडा या जातीच्या लाकडांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. वनविभागाने ही कारवाई केली असून सुमारे १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेश्वर सॉ मिल परिसरात बेहाडा लाकडाचे एकूण ३७ नग अवैधरीत्या वाहतूक करून ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीवरून वनविभागाने छापा टाकून लाकडांचा साठा जप्त केला. तसेच या लाकडाची वाहतूक करणारा एम एच बी १५ २१ क्रमांकाचा ट्रकही वनविभागाने ताब्यात घेतला आहे. उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप शिरसाट, वनरक्षक विनोद पराते यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.