शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

धनदांडग्यांच्या शाळांचे वर्ग वाचविण्याची धडपड

By admin | Published: April 27, 2017 1:33 AM

पीआरसीच्या आड संस्थानिकांना मिळणार सवलत

सदानंद सिरसाट - अकोलाजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीचे नवे वर्ग सुरू करण्याचे आदेश १ मेपूर्वी न पोहोचल्यास जिल्ह्यातील धनदांडग्या संस्थानिकांच्या शाळांचे वर्ग आपोआपच सुरू ठेवण्याचा घाट घातला जात आहे. तशी तयारी झाली असून, पंचायत राज समितीच्या दौऱ्याआड हा छुपा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सध्यातरी स्पष्ट होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी प्रभार सोडताना फाइलवर निर्णय न घेता अधांतरी ठेवला आहे.बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. त्यातही शिक्षण प्रणालीत इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी अशी संरचना अस्तित्वात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या संरचनेत बदल करणेही आवश्यक झाले. त्यासाठी शासनाने २ जुलै २०१३ रोजीच इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळांना पाचवी आणि इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयाने संस्थाचालकांचे धाबे दणाणले. त्यांच्या प्रयत्नाने अद्यापही जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांमध्ये वर्ग सुरू झाले नाहीत. नव्या रचनेनुसार जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीपर्यंत असलेल्या शाळांमध्ये पाचवा वर्ग जोडण्यासाठी ३५६ वर्गांची भर पडणार आहे, तर इयत्ता सातवीपर्यंत असलेल्या शाळांमध्ये आठवा वर्ग जोडण्यासाठी २५४ वर्गांची भर पडणार आहे. शिक्षण समितीच्या ठरावासह प्रस्ताव तयारजिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने ६ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत ठराव घेत ६१० नवे वर्ग निर्माण करण्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने नवे वर्ग निर्मितीला मंजुरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांच्याकडे फाइल सादर केली. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आली. त्यांनीही अभिप्राय दिला आहे. त्यावर गेल्या शुक्रवारी २१ एप्रिल रोजी निर्णय अपेक्षित होता; मात्र कोणताही निर्णय न घेता विधळे यांनी ती फाइल अधांतरी ठेवल्याची माहिती आहे. पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा आडोसाजिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये वर्ग सुरू झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका खासगी शाळांना बसणार आहे. त्यामुळे या फाइलवर निर्णयच होऊ नये, यासाठी संस्थाचालकांनी प्रशासनावर दबाव आणल्याची माहिती आहे. अनेकांना शाळांचे वर्ग बुडण्याची भीती आहे. त्यामुळेच त्यांनी ही फाइल १ मेपर्यंत निर्णयाविना रखडून ठेवण्याची फिल्डिंग लावली आहे. खासगीचे शिक्षक टिपणार विद्यार्थ्यांनाजिल्हा परिषदेच्या शाळांचा निकाल लागताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो. त्याचवेळी खासगी संस्थांचे शिक्षक विद्यार्थ्यांनी टिपून त्याचा प्रवेश निश्चित करतील. ५ मेपर्यंत त्यांना संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या नव्या वर्गासाठी विद्यार्थीच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे जिल्हा नव्या वर्गाची निर्मिती आपोआप थांबणार आहे. ८०० पेक्षाही अधिक शिक्षक भरतीला नखजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्या वर्गाची निर्मिती करताना त्यासाठी नव्या शिक्षकांची पदेही निर्माण होणार आहेत. इयत्ता आठवीच्या वाढणाऱ्या तुकड्यांची संख्या पाहता किमान ८०० शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेला करावी लागणार आहे; मात्र त्याचवेळी खासगी संस्थांचे वर्ग कायम राहिल्यास ‘डोनेशन’ने उखळ पांढरे करून घेण्याची संधी त्यांच्याकडेच राहणार आहे. त्यासाठीच त्यांनी प्रशासनाला सर्वच पातळीवर मॅनेज केल्याची चर्चा आहे.