अकोला : हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहीत वैमुला आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. तसेच मुंबईतील १५00 च्यावर विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ अकोला जिल्ह्यातील सामाजिक व विद्यार्थी संघटना आणि जस्टीस फॉर रोहीत फोरमच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला होता. गांधी जवाहर बाग येथून सकाळी १0 वाजता सुरू झालेल्या या मोर्चात अग्रस्थानी रोहीतचे छायाचित्र असलेले वाहन होते. आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात रोहीतचे छायाचित्र घेतले. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गळा घोटल्याचे निर्देशक म्हणून तोंडावर काळय़ा पट्टय़ा बांधण्यात आल्या होत्या. गांधी जवाहर बागेपासून सुरू झालेला मोर्चा सिटी कोतवाली चौक, तहसील, पंचायत समिती मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या वेळी मोर्चेकरांनी केंद्र सरकार, मुंबई पोलीस आणि हैदराबाद विद्यापीठातील दोषींना सामुहिक श्रद्धांजली वाहली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क आयुक्तांना एक निवेदन विद्यार्थी प्रतिनिधींतर्फे देण्यात आले. मोर्चाला डॉ. वाय.डी. खा, अँड. प्रवीण तायडे, धनंजय मिश्रा आणि डॉ. एम.आर. इंगळे यांनी संबोधित केले.
विद्यार्थी व सामाजिक संघटनांचा मूकमोर्चा!
By admin | Published: February 16, 2016 1:34 AM