विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला बळ मिळावे तसेच फोनोटिक्स संबंधी ज्ञान व्हावे या उद्देशाने सदर वेबिनारचे आयोजन शाळेचे सचिव नितीन झाडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. सदर वेबिनार मध्ये प्रीती जगदेव यांनी कॉम्प्युटर कोडिंग, फोनोटिक्स रिसर्च, तसेच तंत्रज्ञानावर आधारित मार्गदर्शन केले. मनातील न्यूनगंड बाजूला सारून विद्यार्थ्यांनी सदर बाबीला कसे सामोरे जावे, विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत संशोधन वृत्ती कशी जोपासावी, संशोधन संदर्भ कसे गोळा करावे, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, स्वतःला तंत्रज्ञानाधारित कसे करावे या संबंधी स्वतःचे अनुभव सांगत मार्गदर्शन केले. सदर वेबिनारला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नाचे निरसन केले. यावेळी शाळेच्या प्राचार्यासोबत वर्ग ९ वी, १० वीचे विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.
फोटो: