विधान परिषदेची उपसमिती करणार अकोला मनपाचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 01:44 PM2020-02-12T13:44:20+5:302020-02-12T13:44:25+5:30

आ. गोपीकिशन बाजोरिया यांचा समावेश असलेल्या या समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत.

Sub-committee of Legislative Council will do panchnama of Municipal corporation | विधान परिषदेची उपसमिती करणार अकोला मनपाचा पंचनामा

विधान परिषदेची उपसमिती करणार अकोला मनपाचा पंचनामा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनपातील गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी आमदारांचा समावेश असलेली विशेष उपसमिती नियुक्त करण्याचे निर्देश मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी दिले. शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांचा समावेश असलेल्या या समितीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत.
महापालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शासनाकडे तक्रार केली. त्यानुषंगाने मंगळवारी विधान परिषद उपसभापती नीलम गोºहे यांच्या दालनात शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया, शिवसेना गटनेता राजेश मिश्रा, विरोधी पक्षनेता साजिदखान पठाण, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त वैभव आवारे, कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर, नगररचना सहा. संचालक दांदळे, सहा. नगररचनाकार संदीप गावंडे उपस्थित होते. यावेळी महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात झालेल्या गैरकारभाराविषयीचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावर प्रशासनाने खुलासा करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजू एकूण घेत उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठित करण्याचे निर्देश दिले.विविध विभागातील गैरकारभार, सिमेंट रस्ते घोळ, फोर-जी प्रकरण, शासनाकडून प्राप्त अनुदानाचा गैरवापर, पंतप्रधान आवास योजना तसेच १२ व्या व १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अनियमितता यासंदर्भात चौकशी करण्याचा समावेश आहे. महापालिकेस भेट देऊन प्रकल्पांची पाहणी करणे यासह संबंधित अधिकाºयांची साक्ष घेण्याचा समावेश आहे.

उपसमितीमध्ये यांचा समावेश

महाराष्ट्र विधान परिषद नियम १६७ मधील तरतुदीच्या अनुषंगाने विधान परिषद सदस्यांचा समावेश असलेल्या उपसमितिमध्ये गट प्रमुख म्हणून आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. शरद रणपिसे, आ. नागोराव गाणार, आ. डॉ. मनीषा कायंदे, आ. विलास पोतनीस यांचा समावेश आहे. विशेष निमंत्रित म्हणून अमरावती विभागीय आयुक्त, कार्यकारी अभियंता, सा.बां. तसेच कार्यकारी अभियंता मजीप्रा, अकोला यांचा समावेश आहे.

Web Title: Sub-committee of Legislative Council will do panchnama of Municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.