नवतपाच्या पहिल्याच दिवशी उन्हाचा तडाखा; राज्यात अकोल्याचे तापमान सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:17 AM
Akola has the highest temperature in the state : मंगळवारी पहिल्याच दिवशी अकोलेकरांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला.
अकोला : नवतपाचे नऊ दिवस सुरू झाले आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी अकोलेकरांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला. जिल्ह्याचे तापमान ४१.८ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले आहे. हे राज्यातील सर्वाधिक तापमान होय. यंदा उन्हाळ्यात जिल्ह्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे. चक्रीवादळामुळे मागील काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उष्णतेची लाट कमी झाली होती. तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण मंगळवारपासून जिल्ह्यात नवतपाचा परिणाम जाणवायला लागला आहे. पुन्हा तापमानात वाढ झाल्याने अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा पारा ४१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामावरही परिणाम झाला. उन्हाची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.या जिल्ह्यात सर्वाधिक तापमानअकोला ४१.८जळगाव ४१.६परभणी ४०.६चंद्रपूर ४०.६वर्धा ४०.५यास चक्रीवादळाचा परिणाम कमीचतौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर यास चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. परंतु जिल्ह्यात यास चक्रीवादळाचे परिणाम कमी जाणवणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. तरी काही प्रमाणात तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.