रविवार विशेष : स्कूटरच्या इंजीनवर बनवले डवरणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 03:46 PM2019-07-14T15:46:09+5:302019-07-14T15:46:49+5:30
बोरगाव वैराळे: चारा टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत धामणा येथील श्याम मुग्दल भांबेरे ...
बोरगाव वैराळे: चारा टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत धामणा येथील श्याम मुग्दल भांबेरे या अल्पभूधारक शेतकºयाने स्कूटरच्या इंजीनवर वखरणी करणाºया यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राच्या माध्यमातून १०० रुपयात १ एकरावर डवरणी होत असल्याची माहिती भांबेरे यांनी दिली आहे.
धामणा येथील अल्पभूधारक व अल्पशिक्षित शेतकरी श्याम मुग्दल भांबेरे हे गावात मागील पाच वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून वेल्डिंगचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी कुठल्याही प्रकारचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण न घेता हा व्यवसाय सुरू केला आहे. शेतीसाठी लागणारे बैलावर चालणारे वखर, डवरे, तिफण, बैलबंडी तसेच कूलर बनविण्याचे काम करून आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी हातभार लावत असतात. हे सर्व करत असताना त्यांनी यावर्षी शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा उद्देश ठेवून जुन्या स्कूटरच्या इंजीनचा वापर करून पेट्रोलवर चालणारे वखर व डवरे बनविले. हे इंजीन आणि पेट्रोलवर चालणाºया वखर व डवºयाला १ एकर शेतीची वखरणी आणि डवरणी करण्यासाठी केवळ एक लीटर पेट्रोल लागते. तसेच तासभरात हे आधुनिक अवजार तीन एकर शेतामध्ये पिकातील तण नष्ट करत असल्याचा दावा श्याम भांबेरे यांनी केला आहे. या यंत्रामुळे शेतकºयांचे पैसे आणि वेळही वाचणार आहे.
वेळ आणि पैशांची बचत
तीन एकर शेतीची मशागत करण्यासाठी बैलांची व एका माणसाच्या मजुरीचे म्हणजे जवळजवळ १ हजार रुपयांची बचत या यंत्रामुळे होणार आहे. पहिल्या वेळी हे अवजार बनविण्यासाठी १० हजार रुपये खर्च येत असला तरी शेतीच्या पेरणीपासून डवरणी, वखरणी व पेरणीपूर्वी करण्यात येणाºया मशागतीच्या कामासाठी एकाच अवजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेटिंग करून उपयोगी पडत आहे. त्यामुळे कमी खर्चात व कमी वेळात जास्तीत जास्त काम होणार असल्यामुळे श्याम भांबेरे यांनी बनविलेले शेती उपयोगी अवजार शेतकºयासाठी फायद्याचे ठरणार आहे.