१२८ ग्रा.पं. सदस्य, १३ सरपंचांवर अपात्रतेची टांगती तलवार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:22 PM2019-08-17T12:22:35+5:302019-08-17T12:22:45+5:30
अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे
अकोला: ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अकोला तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी प्रक्रिया शुक्रवार, १६ आॅगस्टपासून अकोला उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे
ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात येते. सन २०१५-१६ आणि २०१७-१८ या दोन वर्षात अकोला तालुक्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडून आलेल्या १३ सरपंच व १२८ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यानुषंगाने विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला उपविभागीय अधिकाºयांना दिले. त्यानुसार विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्टपासून अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आली. या सुनावणीमध्ये संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचे जबाब नोंदविल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील संबंधित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे.
९४ सदस्यांची घेतली सुनावणी; जबाब नोंदविले!
विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया अकोला तालुक्यातील १३ सरपंच आणि १२८ ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणीचर नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या ९४ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी १६ आॅगस्ट रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली. संबंधित सदस्यांचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्या समक्ष जबाब नोंदविण्यात आले.