.......................
राज्यभर भीक मांगाे आंदाेलन करणार
अकाेला : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या बैठकीत कंत्राटदारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ३ मे पासून राज्यभर भीक मांगाे आंदाेलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
............................
खेमका यांना श्रीराम सेवा समितीची श्रद्धांजली
अकाेला : गीता प्रेस गाेरखपूरचे अध्यक्ष राध्येश्याम खेमका यांच्य निधनामुळे माेठी हानी झाली असून, श्रीराम शाेभायात्रा समितीच्या वतीने रविवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
..............................
एसटी बसमध्ये प्रवाशांची गर्दी
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, प्रशासनाकडून आवश्यक खबरदारीचे आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी बसमध्ये चढताना प्रवाशांची लक्षणीय गर्दी दिसून येते. हा प्रकार कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरत असून, यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
............................
कोविड अहवालासाठी रुग्णांची फरपट
अकोला : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढले. मात्र, चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे कळण्यासाठी संदिग्ध रुग्णांना तीन तेच चार दिवस अहवालच मिळत नसल्याचे समोर आले आहे.
............................
जलवाहिनी फुटली, पाण्याचा अपव्यय
अकोला : टिळक रोड स्थित महापालिकेच्या भारतीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जलवाहिनी फुटल्याने दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही जलवाहिनी फुटली असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
............................
ऑटोमध्ये विनामास्क प्रवासी वाहतूक
अकोला : जिल्हा प्रशासनातर्फे मध्यंतरी नो मास्क, नो एंट्री ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, अनेकांना या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने ऑटोमध्ये प्रवासी विनामास्क प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.
............................
नळ जोडण्यांची घेणार माहिती!
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नळ जोडण्यांची माहिती घेण्याची माेहीम जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये गावांतील घरे, वैध नळ जोडण्या व अवैध नळ जोडण्या यासंदर्भात माहिती संकलित करण्यात येणार आहे.
.....................................
‘सीइओ’ घेणार ‘बीडीओं’ची बैठक!
अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार ६ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) बैठक घेणार आहेत. त्यामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाणीपट्टी वसुली व विकासकामांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीचे पत्र जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
........................................
शाखा अभियंत्यांची १५ पदे रिक्तच!
अकोला : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शाखा अभियंत्यांची १५ पदे अद्याप रिक्तच आहेत. याशिवाय विभागाचे कार्यकारी अभियंता पद आणि चार उपअभियंत्यांची पदे देखील रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांचा अतिरिक्त प्रभार कार्यरत अभियंत्यांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची रिक्त पदे केव्हा भरण्यात येणार, यासंदर्भात प्रतीक्षा केली जात आहे.
.............................................................
वाळूची अवैध वाहतूक जोरात!
अकोला : जिल्ह्यातील दोन वाळूघाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या जिल्ह्यातील उर्वरित वाळूघाटांमधून वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून, यासंदर्भात प्रशासनामार्फत उपाययोजना करण्याची गरज आहे.
........................................................
कांदा बीजोत्पादन काढणीला
अकोला : जिल्ह्यातील कांदा बीजोत्पादन काढणीला आले आहे. यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा बीजोत्पादनाची लागवड करण्यात आली होती. या पिकाला अवकाळीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते.
--------------------------------------------
उन्हाळी भुईमूग बहरले
अकोला : जिल्ह्यातील दोन हजार ५९३ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भुईमूग लागवड करण्यात आली आहे. भुईमूग पीक चांगले बहरले आहे. मध्यंतरी चार दिवस अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने या पिकाला फटका बसला. यंदा चांगले पीक होण्याचा अंदाज आहे.