खरिपात १३९८ कोटी पीक कर्ज वाटपाचे ‘टार्गेट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:43 PM2019-05-07T13:43:19+5:302019-05-07T13:43:27+5:30
अकोला: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे.
- संतोष येलकर
अकोला: यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट (टार्गेट) ठरविण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचा आराखडा तयार करण्यात आला असून, ८ मे रोजी जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत या आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे.
सन २०१९-२० या वर्षातील खरीप व रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेमार्फत तयार करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामात जिल्ह्यात १ हजार ४७२ कोटी ४० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामध्ये २०१९-२० या वर्षातील खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ८४७ शेतकºयांना १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) निश्चित करण्यात आले आहे. यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या आराखड्यास ८ मे रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली होणाºया जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे.
बँकनिहाय खरीप पीक कर्ज वाटपाचे असे उद्दिष्ट!
बँक शेतकरी रक्कम (कोटीमध्ये)
राष्ट्रीयीकृत बँका ६५०९९ ५२०.७०
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ८४९०६ ६७९.२५
ग्रामीण बँक १७४५६ १३९.६५
खासगी बँका ७३८६ ५९.०९
.................................................................................................
एकूण १७४८४७ १३९८.७८
कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६३.९५ कोटींची वाढ!
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यावर्षीच्या खरीप हंगामात १ हजार ३९८ कोटी ७८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६३ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ करण्यात आल्याचे चित्र आहे.
गतवर्षीच्या हंगामातील असे आहे पीक कर्जाचे वाटप!
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना १ हजार ३३४ कोटी ८३ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यापैकी केवळ ४१९ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण होते.