टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 10:45 PM2020-01-04T22:45:13+5:302020-01-05T12:50:02+5:30

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय ...

TB-free India's mission - Dr. Shivhari Ghorpade | टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

Next

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २४ जानेवारीपासून क्षयरोग जनजागृती व क्षयरुग्ण विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने अधिष्ठाता तथा सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या स्टेट टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. शिवहरी घोरपडे यांच्याशी साधलेला संवाद...

क्षयरुग्णांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणसाठी काय तयारी आहे?

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बिकानेर येथे ९ व १० जानेवारी रोजी नॅशनल टास्क फोर्सच्या वेर्स्टन झोनची बैठक होणार असून, यामध्ये महाराष्ट्रासह इतर पाच राज्यांचा सहभाग असेल. बैठकीनंतर २४ जानेवारीपासून राज्यासह जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येईल.

क्षयरुग्ण शोध मोहिमेचे स्वरुप कसे असेल?

जिल्हा क्षयरोग तथा मनपा क्षयरोग विभागासोबतच प्रशिक्षणार्थी डॉक्टर व वैद्यकीय अधिकाºयांमार्फत शहरी व ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविली जाईल. सोबतच क्षयरोग संदर्भात जनजागृतीही केली जाईल. क्षयरुग्णांच्या शोध मोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग दिले जाणार असून, यामध्ये खासगी डॉक्टरांचाही समावेश असेल.

काय आहे मोहिमेचा उद्देश?

२०२५ पर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करायचे आहे. त्या अनुषंगाने २४ जानेवारी ते २४ मार्च पर्यंत विशेष मोहीम राबविली जाईल. यामध्ये प्रामुख्याने नव्या आणि पुनरुपचारावरील क्षयरुग्णांना बरे करणे, रुग्ण शोधण्याचा दर वाढवणे, रेजिस्टंट क्षयरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढविणे, खासगी रुग्णालयांमधील क्षयरोग सेवेची परिणामकारकता वाढविणे आदि प्रमुख उद्देश असणार आहे.

मोहिमेसाठी जिल्हास्तरावर काय तयारी केली आहे?

जिल्हा स्तरावर कोअर कमेटीची बैठक घेण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा क्षयरोग अधिकारी व मनपा क्षयरोग अधिकारी यांच्या सहकार्याने शहरी व ग्रामीण भागात क्षयरुग्ण शोध मोहिमेचा आराखडा आखण्यात येईल. ‘सीबीनॅट’ मशीनच्या माध्यमातून क्षयरोगाचे निदान केले जाणार असून, रुग्णांवर आवश्यकतेनुसार योग्य उपचाराची तयारी केली जात आहे.

क्षयरोग मुक्तीसाठी कशावर असणार विशेष भर ?

प्रत्येक क्षयरुग्णापर्यंत पोहोचण्यावर भर राहणार असून, १५ ते ४५ वर्ष वयोगटातील महिला व पुरुषांकडे विशेष लक्ष असणार आहे. शिवाय, समोर आलेल्या प्रत्येक क्षयरुग्णावर नियमीत उपचार करुन शंभर टक्के रुग्ण बरे होणे अपेक्षीत आहे. मोहीमेच्या यशस्वीतेसाठी कोअर कमेटीकडे विशेष लक्ष असणार आहे.

Web Title: TB-free India's mission - Dr. Shivhari Ghorpade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.