तेल्हारा पंचायत समितीचा कृती आराखडा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:07 PM2017-12-14T23:07:57+5:302017-12-14T23:11:20+5:30

तेल्हारा : तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्‍याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्‍यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे.

Telhara Panchayat Samiti's action plan on paper! | तेल्हारा पंचायत समितीचा कृती आराखडा कागदावरच!

तेल्हारा पंचायत समितीचा कृती आराखडा कागदावरच!

googlenewsNext
ठळक मुद्देतेल्हारा तालुक्यातील चित्र चार गावांत पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : वीज पुरवठा खंडित झाल्याने, नियोजन नसल्याने तर काही गावामध्ये पाण्याचे स्रोत आटल्याने तेल्हारा तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्‍याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्‍यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे.
तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी २९ गावांमध्ये पंचायत समितीने नवीन कूपनलिका घेण्याचे प्रस्तावित आहे. खापरखेडा, खेल सटवाजी, उमरी, भिली, तुदगाव, वाकोडी, सौंदळा, सोनवाडी, चिपी, इसापूर, अटकळी, कोठा, तळेगाव पातुर्डा, मनात्री, सदरपूर, वरूड वडनेर, मालपुरा, धोंडा आखर, माळेगाव बाजार, तळेगाव बु., तळेगाव वडनेर, पिवंदळ बु., चिचारी, दिवानझरी, बेलखेड, राखेड, भोकर, वाडी अदमपूर या २९ गावांमध्ये काही गावात नवीन कूपनलिका घेणे तर पंचायत समितीच्या २0१७ च्या कृ ती आराखड्यात २४ गावांतील २८0१0 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरात मिळाली होती. यामध्ये नळ पुरवठा, विशेष दुरुस्ती तीन कामे, तात्पुरती योजना चार गावे अशी प्रस्तावित कामे होती. प्रत्यक्षात कुठेही काम करण्यात आलेले नव्हते. तालुक्यात पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलयुक्त शिवार योजना राबवून ५ ते ६ कोटी खर्च करून १२ नदी खोलीकरण बंधारे, शेततलाव ही कामे तालुक्यात मोठय़ा प्रमाणात करण्यात आली; पण पाहिजे तशी पाण्याची पातळी वाढली नसल्याचे दिसते.

तालुक्यात होणार सहा कोटींची कामे!
सन २0१७-१८ मध्ये कृ षी विभागाने पाण्याची पातळी वाढावी म्हणून नाला खोलीकरण, नवीन सिमेंट बांध खोलीकरण व रुंदीकरण, ई-क्लास शेततळे, गाव तलाव, विहीर पुनर्भरण, गाव तलाव दुरुस्ती व इतर कामे करण्यासाठी या कामावर जवळपास सहा कोटी रुपयांचे काम तालुक्यात होणार आहे. तालुक्यात जास्तीत जास्त कामे व्हावी म्हणून तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर व कृ षी तालुका कृ षी अधिकारी अविनाश मेश्राम प्रयत्न करीत आहेत.

या गावांमध्ये कूपनलिका प्रस्तावित
खापरखेडा, खेल सटवाजी, उमरी, भिली, तुदगाव, वाकोडी, सौंदळा, सोनवाडी, चिपी, इसापूर, अटकळी, कोठा, तळेगाव पातुर्डा, मनात्री, सदरपूर, वरूड वडनेर, मालपुरा, धोंडा आखर, माळेगाव बाजार, तळेगाव बु., तळेगाव वडनेर, पिवंदळ बु., चिचारी, दिवानझरी, बेलखेड, राखेड, भोकर, वाडी अदमपूर.

तालुक्यात बर्‍याच गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्या गावांमधील प्रस्ताव बोलावून सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजुरी मिळाल्यानंतर कामांना सुरुवात करण्यात येईल.
- सचिन झापर्डे, उपसभापती, पं.स. तेल्हारा.

मालठाणा बु. हे गाव शिवाजीनगरमध्ये येत असून, येथे एक कूपनलिका आहे. या एका कूपनलिकेवर मशीन आहे. येथे वारंवार विद्युत पुरवठा बंद झाल्यास गावकर्‍यांचे पाणी होत नाही, त्यामुळे गावकरी शेतातून पाणी आणतात. गावकर्‍यांनी वेळोवेळी मागणी करूनही कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
- डॉ. पंजाबराव धामोडे, सदस्य, ग्रा. पं. शिवाजीनगर.

Web Title: Telhara Panchayat Samiti's action plan on paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.