तेल्हारा तालुका खरेदी विक्री संस्थेवर अवसायक येणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:25+5:302021-02-14T04:18:25+5:30
या संस्थेच्या संचालक मंडळाचे अंतर्गत वाद आहेत. कित्येक महिन्यापासून हे वाद सुरू असून शेतमाल खरेदी त्याचे मोजमाप मालाची वाहतूक ...
या संस्थेच्या संचालक मंडळाचे अंतर्गत वाद आहेत. कित्येक महिन्यापासून हे वाद सुरू असून शेतमाल खरेदी त्याचे मोजमाप मालाची वाहतूक त्याचे चुकारे हमालाची मजुरी यासह अनेक कामांमध्ये अडथळे येत असल्याने या सर्वांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे. तसेच संस्थेचे ऑडिट सुद्धा बाकी असून संस्थेमधील कर्मचारी सुद्धा कामावर येत नाहीत. संस्थेची अनेक महिन्यापासून संचालक मंडळाची सभा झाली नाही. सर्व कारभार ठप्प आहे. त्यामुळे हे संचालक मंडळ बरखास्त करून शासनामार्फत या संस्थेवर प्रशासकीय मंडळ बसविण्याचा घाट काही जणांनी रचला होता. त्याबाबत शासनाकडून हालचाली सुद्धा झाल्या होत्या. मात्र ज्यांनी हे केले त्यांना कदाचित हे माहिती नाही की, संचालक मंडळाच्या बरखास्तच्या आदेशाला विभागीय सह निबंधकांनी स्थगिती दिली आहे. संचालक मंडळ आज कायम आहे. त्यामुळे जोपर्यंत संचालक मंडळ बरखात होत नाही तोपर्यंत प्रशासक मंडळ नियुक्त केल्या जात नाही. त्यामुळे तो निर्णय थंडबस्त्यात पडला आहे. मात्र सहायक निबंधक तेल्हारा यांनी संचालक मंडळ व कर्मचारी कामकाज करीत नसल्याने संस्थेवर अवसायक का नेमण्यात येऊ नये, अशी नोटीस नुकतीच बजावली आहे. याबाबत काय म्हणणे आहे ते सादर करावे. समाधान न झाल्यास अंतिम आदेश काढून संस्थेवर अवसायक नियुक्त केल्या जाईल असा नोटीसमध्ये उल्लेख आहे.