- अतुल जयस्वाल लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वेने दररोज २०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या देशभरातील तब्बल ५१२ पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याची तयारी सुरू केली असून, यामध्ये अकोल्याहून जाणाऱ्या भुसावळ-नागपूर, भुसावळ-वर्धा तसेच अकोला येथून सुटणाऱ्या अकोला-पूर्णा, अकोला-परळी अशा एकूण १० गाड्यांचा समावेश आहे.रेल्वेने देशभरातील लोकप्रिय पॅसेंजर गाड्यांचा वेग वाढविण्याचे ठरविले असून, यासाठी त्यांना एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दररोज २०० किलोमीटरपेक्षा अधिक पल्ला गाठणाऱ्या पॅसेंजर गाड्यांनाच एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित करण्याात येणार आहे.यामुळे या गाड्यांचा वेग तर वाढेलच शिवाय अंतर गाठण्याची सरासरी वेळ एक ते दोन तासांनी कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गरज पडल्यास या गाड्यांच्या थांब्याची संख्याही कमी करण्यात येणार असून, भाड्यात बदल करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणाऱ्या या गाड्यांमध्ये रेल्वेच्या सर्वच झोनमधील पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.
अकोल्याहून जाणाऱ्या व अकोल्यातून सुटणाऱ्या या गाड्यागाडी क्र. पासून-पर्यंत५१२८५ भुसावळ ते नागपूर५१२८६ नागपूर ते भुसावळ५११९७ भुसावळ ते वर्धा५११९८ वर्धा ते भुसावळ५७५८१ अकोला ते पूर्णा५७५८२ पूर्णा ते अकोला५७५८३ अकोला ते पूर्णा५७५८४ पूर्णा ते अकोला५७५३९ अकोला ते परळी५७५४० परळी ते अकोला
मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या ९५ गाड्या पॅसेंजरमधून एक्स्प्रेसमध्ये परिवर्तित होणाऱ्या गाड्यांमध्ये मध्य रेल्वेच्या ३३, तर दक्षिण-मध्ये रेल्वेच्या ६२ गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये अकोल्याहून जाणाऱ्या व अकोल्यातून सुटणाऱ्या तसेच अकोल्यात येणाऱ्या १० गाड्यांचाही समावेश आहे. यामध्ये मेमू, डेमू गाड्यांनाही एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात येणार आहे.