अकोला जिल्ह्यातील दहा पोलीस झाले फौजदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 06:37 PM2021-02-13T18:37:19+5:302021-02-13T18:37:26+5:30
Akola Police पोलिस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षेत पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचारी फौजदार झाले आहेत.
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2017 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षेत पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचारी फौजदार झाले आहेत.
लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी राज्यातील 4 हजार 519 पोलीस कर्मचारी बसले होते. यापैकी 1 हजार 451 उमेदवार शारीरिक चाचणी करता पात्र ठरले होते. त्यांची शारीरिक चाचणी आयोगाकडून केल्यानंतर पुणे नाशिक मुंबई औरंगाबाद अमरावती येथे विविध तारखेत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील 10 पोलिस कर्मचारी उत्तीर्ण झाले असून आता ते फौजदार झाले आहेत. यामध्ये रावसाहेब बुधवंत, बालाजी सानप, देवानंद कायंदे, श्रीराम जाधव, परमेश्वर केंद्रे, प्रवीण मोरे, सचिन धात्रक, विनोद खाडे, रवी सावतकर, सचिन गोखले यांचा समावेश आहे.