अकोला: घराच्या बाजुला राहणाºया युवकाचे पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याची कुणकुण लागल्यावर पतीने युवकाला गुटखा खाण्याच्या निमित्ताने घराबाहेर बोलावून त्याच्यावर धारदार सुºयाने वार करून त्याची हत्या केली. या प्रकरणात प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश य.गो. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी आरोपी पतीस दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ८ जून २0१७ रोजी बार्शिटाकळी तालुक्यातील रेडवा येथे घडली होती.रेडवा येथील गोवर्धन मखराम राठोड यांच्या तक्रारीनुसार रोहिदास केशव जाधव(४0) याच्या पत्नीसोबत नागेश गोवर्धन राठोड(२५) याचे अनैतिक संबध होते. या दोघांच्या संबधाची रोहिदासला कुणकुण लागली होती. एवढेच नाहीतर रोहिदासने दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिले होते. परंतु रोहिदास काही दिवस शांत राहीला होता. ८ जून २0१७ रोजी घराजवळच राहणाºया नागेश राठोड याला रोहिदास जाधव याने गुटखा खाण्याच्या निमित्ताने बाहेर बोलावले. नागेश दुकानावर आला. त्यावेळी नागेश मित्र राहुल जाधव हा सुद्धा तेथे आला. नागेश याने त्याला गुटख्याची पुडी मागितली आणि त्याला रोहिदासने त्याच्या पत्नीसोबत पाहिल्याचे सांगितले. तेवढ्यात आरोपी रोहिदास जाधव तेथे आला आणि त्याने येथे का बसला असे म्हणत नागेश राठोड याच्यासोबत वाद घातला. रोहिदासने सोबत आणलेली धारदार सुरी बाहेर काढली आणि नागेशच्या काखेत खुपसली. तो दुसºया वार करणार, तेवढ्यात राहुल जाधवने त्याला बाजुला ढकलले. नागेश व राहुल आरडाओरड केल्यामुळे लोक गोळा झाले. त्यामुळे आरोपी पळून गेला. नागेशचे आईवडील व राहूलने जखमी अवस्थेत नागेश राठोड याला सर्वोपचार रूग्णालयात भरती केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ९ जून रोजी गोवर्धन राठोड यांनी बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रोहिदास जाधव याच्याविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस अटक केली. पोलिसांनी तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश य.गो. खोब्रागडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ९ साक्षीदार तपासले. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला दहा वर्ष सश्रम कारावास, तीन हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी बाजु मांडली. (प्रतिनिधी)