छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक; १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर

By संतोष येलकर | Published: April 5, 2024 06:16 PM2024-04-05T18:16:03+5:302024-04-05T18:16:16+5:30

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत (४ एप्रिलपर्यंत) २८ उमेदवारांकडून ४० अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते.

The applications of 11 candidates were rejected | छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक; १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर

छाननीत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक; १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर

संतोष येलकर

अकोला :
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २८ उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवार ५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये ११ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर आले असून, १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर आले.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत (४ एप्रिलपर्यंत) २८ उमेदवारांकडून ४० अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते. संबंधित उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया ५ एप्रिल रोजी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत पूर्ण करण्यात आली. छाननीत २८ पैकी ११ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले असून, १७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, निवडणूक निरीक्षक (सामान्य) रामप्रतापसिंग जाडोन, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.

अर्ज नामंजूर करण्यात आलेले असे आहेत ११ उमेदवार !

छाननी प्रक्रियेत ११ उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये रमेश इंगळे (बहुजन समाज पार्टी), अरूण भागवत (अपक्ष), पूजा शर्मा (अपक्ष), सचिन शर्मा (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), महेंद्र मिश्रा (अपक्ष), अंबादास दांदळे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष), ॲड. रामभाऊ खराटे (वीरों के वीर इंडियन पार्टी), रजनीकांत (अपक्ष), शेख मजहर शेख इलियास (अपक्ष) यांचा समावेश आहे.

अर्ज मंजूर करण्यात आलेले असे आहेत १७ उमेदवार !

छाननीत १७ उमेदवारांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनुप धोत्रे (भारतीय जनता पार्टी), अॅड.प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी), डाॅ.अभय पाटील (भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस), मुरलीधर पवार (अपक्ष), मो. एजाज मो. ताहेर (अपक्ष), धर्मेंद्र कोठारी (अपक्ष), अशोक थोरात (अपक्ष), रत्नदीप गणोजे (अपक्ष), काशिनाथ धामोडे (बहुजन समाज पार्टी), शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग), प्रीती सदांशिव (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सोशल), बबन सयाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), नारायणराव गव्हाणकर (अपक्ष), रविकांत अढाऊ (जय विदर्भ पार्टी),दिलीप म्हैसने (अपक्ष) गजानन दोड (अपक्ष), ॲड. उज्ज्वला राऊत (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) यांचा समावेश आहे.

Web Title: The applications of 11 candidates were rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.