जप्त केलेल्या अवैध साठ्यातील रेतीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:22 AM2021-09-23T04:22:14+5:302021-09-23T04:22:14+5:30
वाडेगाव: परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ११ ब्रास अवैध रेतीसाठा दि.२० सप्टेंबर रोजी जप्त केला होता. दरम्यान, बुधवारी या ...
वाडेगाव: परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ११ ब्रास अवैध रेतीसाठा दि.२० सप्टेंबर रोजी जप्त केला होता. दरम्यान, बुधवारी या साठ्यांची पाहणी केली असता ११ ब्रासपैकी ३ ब्रास रेती चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
महसूल विभागाकडून तीन जागेवरील एकूण ११ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला होता.
या अवैध रेती साठाचे ढिगारे दि. २० सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ वाजताच्या दरम्यान तीन ठिकाणावरील वेगवगेळा प्लॅाटमधून जप्त केला होता. पंचनामा करून प्रभारी पोलीस पाटील सुनील अंभोरे यांच्या ताब्यात देण्यात आला होता. हा साठा जप्त करण्यासाठी नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभारे,पोलीस पाटील सुनील अंभोरे,मंडळ अधिकारी सी.सी.बोळ, तलाठी एस.ए. इंगळे,देगाव तलाठी व्ही.डी. वानखडे, कोतवाल नारायण घाटोळ, नारायण मानकर,आशिष भटकर,आदी कर्मचारी यांच्या सह्या घेऊन पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर आज २२ सप्टेंबर बुधवार रोजी प्रभारी पोलीस पाटील सुनील अंभोरे यांनी पुन्हा त्या अवैध रेती पाहणी केली असता या ११ ब्रास रेती साठा मधील ३ ब्रास रेती चोरी गेल्याचे आढळून आले. तसेच समजताच सुनील अंभोरे यांनी तहसीलदारांकडे माहिती दिली आहे.