लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे; मात्र ऑनलाइन अर्ज भरण्याच्या ‘स्वॉफ्टवेअर’मध्ये जिल्ह्यातील २५ गावे दिसत नसल्याने, संबंधित गावांमधील शेतकर्यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा वांधा निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या स्वॉफ्टवेअरमध्ये २५ गावे तातडीने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अपर जिल्हाधिकार्यांनी बुधवारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडे पाठविला.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या वेबसाइटवर भरण्याचे काम जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर गत २४ जुलैपासून सुरू करण्यात आले आहेत. कर्जमाफीचे शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे; मात्र ऑनलाइन स्वॉफ्टवेअरमध्ये जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांतील २५ गावे दिसत नसल्याने, संबंधित २५ गावांमधील थकबाकीदार शेतकर्यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या स्वॉफ्टवेअरमध्ये जिल्ह्यातील २५ गावे तातडीने समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ६ सप्टेंबर रोजी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाच्या संचालकांकडे पाठविला आहे.
ऑनलाइन ‘ स्वॉफ्टवेअर’मध्ये नसलेली अशी आहेत गावे !पातूर तालुका : दादुलगाव, बाभळी, कोठारी बु., दधम, वरणगाव, चिंचखेड (पातूर), भानोस, बेलतळा, निमखेड, शिवपूर, अडगाव बु., हिंगणा वाडे, उमरवाडी.तेल्हारा तालुका : साल्काबाद, नुराबाद, ममतदाबाद, तेल्हारा बु., तेल्हारा खुर्द, सोनखेळ.अकोट तालुका : निजामपूर, गिरजापूर, गरसोळी, सालखेड, आगासखेड, पिलकवाडी.
एक लाखावर शेतकर्यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज! कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये ६ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात १ लाख ४0 हजार ७६२ शेतकर्यांच्या अर्जांची नोंदणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ३ हजार ६४७ शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज सेतू केंद्रांवर भरल्याचे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.