जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही; खबरदारी मात्र बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:07+5:302021-01-13T04:46:07+5:30

बर्ड फ्लूसंदर्भात बाळगावयाच्या खबरदारीसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार ...

There is no bird flu in the district; But be careful | जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही; खबरदारी मात्र बाळगा

जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही; खबरदारी मात्र बाळगा

Next

बर्ड फ्लूसंदर्भात बाळगावयाच्या खबरदारीसंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात आतापर्यंत पोल्ट्री फार्ममधील ३५० पक्षांचे सिरो (नासिकाग्रातील स्राव) नमुने रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे येथे पाठवण्यात आले. हे सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यावरून जिल्ह्यात कुठेही बर्ड फ्लू नाही, असा निर्वाळा डॉ. बावने यांनी दिला. तसेच शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा जिल्ह्यातील १२ वेगवेगळ्या ठिकाणच्या १३० पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. त्यासाठी पशुवैद्यकांची आठ पथके तयार करण्यात आली आहेत, अशीही माहितीही जिल्ह्यात कुठेही अचानक व मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत असल्याचे दिसल्यास शेतकरी, पशुपालकांनी, पोल्ट्री चालकांनी त्याची माहिती तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रोजच्या व आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी. पोल्ट्री फार्म असलेल्या भागात विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत धुण्याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) एक लीटर पाण्यात सात ग्रॅम याप्रमाणे द्रावण तयार करून कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गटारे, नाल्या, पशु-पक्ष्यांचा वावर असलेला भाग या ठिकाणी १५ दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारणी करावी. जिल्ह्यात बाहेरून येणारे पक्षी ज्या ठिकाणी येतात तेथे वारंवार सर्वेक्षण करण्यात यावे.

पोल्ट्री फार्म चालकांनी पोल्ट्री फार्ममध्ये स्वच्छता ठेवावी, वाहतूक, मलमूत्र व्यवस्थापन इ.बाबत अधिक खबरदारी व स्वच्छता उपाययोजना राबवाव्या. पक्षी मृत पावल्यास त्यांचे मृतदेह हे उघड्यावर न टाकता, ते जमिनीत खोल खड्डा करून पुरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: There is no bird flu in the district; But be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.