खाद्य तेलावर आयात शुल्क वाढल्यानंतरही सोयाबीनच्या दरात अपेक्षीत वाढ नाहीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:39 PM2017-12-25T13:39:10+5:302017-12-25T13:44:01+5:30
अकोला : सोयाबीन दरात चढ उतार सुरू असून, दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. पण वेअर हॉऊसमध्ये शेतमाल ठेवण्याची कालमर्यादा सहा महिनेच असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतमाल तेथून काढून विकावा लागत आहे.सर्वच प्रकारच्या खाद्य तेलावर आयात शुल्क वाढल्यानंतर सोयाबीनच्या दरात बऱ्या पैकी वाढ होईल अशी अपेक्षा होती पंरतु दरात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली नाही.

केंद्र शासनाने यावर्षी प्रतिक्विंटल २,६७५ रू पये हमी दर जाहीर केले आहेत.त्यावर २०० रू पये बोनसही दिले जाणार आहे.पण सुरवातीला नाफेडव्दारे शासकीय खरेदी केंद्रावर १२ टक्के ओलाव्याचे निकष लावण्यात आल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकले.यामध्ये सर्वाधिक अल्पभूधारक ते मध्यम शेतकºयांचा समावेश होता.यावर्षी उशीरा व कमी झाल्याने पेरणीला उशीर झाला. पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडला,त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. एकरी अर्धा ते एक क्विंटलही उतारा लागला नाही. पण दुसरीकडे शासकीय खरेदी केंद्रावर प्रतवारीचे निकष लावण्यात आल्याने हमीदरापेक्षा प्रतिक्विंटल ९०० ते १००० रू पये कमी दराने शेतकºयांना सोयाबीन विकावे लागले.
दरम्यान,मागील महिन्यात सर्वच प्रकारच्या खाद्य तेलाच्या आयातीवर केंद्र शासनाने आयात शुल्क दुप्पट वाढवले. त्यामुळे दर वाढतील अशी शेतकºयांना अपेक्षा होती पण हे दर २,६०० ते २,९०० च्यावर पोहोचलेच नाहीत,आजही कमीत कमी प्रति क्विंटलं दर २,६०० रू पये एवढेच आहेत. तर हमी दर हे बोनस मिळून २,८७५ रू पये आहेत.दुसरीक डे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकºयांनी विविध यंत्रणांच्या वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवले आहे. परंतु तेथे सोयाबीन ठेवण्याची काल मर्यादा ६ महिनेच आहे.या ६ महिन्यासाठी ६ टक्के व्याज आहे. त्यांनतर ८ व १२ टक्के व्याज असल्याने शेतकºयांना शेतमाल काढून विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे एकूण बाजारातील चित्र आहे.
- सोयाबीनचे दर बºयापैकी वाढतील अशी अपेक्षा होती.पण आजमितीस हे दर प्रति क्विंटलं २,६०० ते २,९०० रू पये आहेत.
सुनील मालोकार,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.