महात्मा बसवेश्वरांचे विचार विश्वाचा आरसा : सिद्लिंग शिवाचार्य स्वामी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 03:50 PM2019-08-27T15:50:44+5:302019-08-27T15:51:07+5:30

मलकापूर येथे लिंगदिक्षा संस्कार, गुरूमंत्र आणि प्रवचन कार्यक्रमाला सुरूवात झाली.

Thoughts of Mahatma Basaveshwara mirror of the universe: Siddling Shivacharya Swami Maharaj | महात्मा बसवेश्वरांचे विचार विश्वाचा आरसा : सिद्लिंग शिवाचार्य स्वामी महाराज

महात्मा बसवेश्वरांचे विचार विश्वाचा आरसा : सिद्लिंग शिवाचार्य स्वामी महाराज

Next

अकोला :      जगातील अनेक देशांच्या संविधानाचा गाभा हा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांवर आधारीत आहे. महात्मा बसवेश्वरांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजसुधारणेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून प्रवाहीत केला. याच विचारांवर लिंगायत धर्म उभा राहिल्याचं प्रतिपादन बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील पलसिद्ध मठाचे मठाधिपती सिद्लिंग शिवाचार्य स्वामी महाराज यांनी केलं. ते अकोला येथे २५ ऑगस्टला पार पडलेल्या लिंगायत समाजाचा लिंगदिक्षा आणि संस्कार कार्यक्रमातील प्रवचनाचे पुष्प गुंफतांना बोलत होते. हा कार्यक्रम अकोल्यातील मलकापूर भागातील बसवेश्वर चौकातल्या गवळी मंगल कार्यालयात झाला. यावेळी व्यासपीठावर महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष महेश आप्पा शेटे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विश्वनाथ आप्पा हजारे,  ॲड. नितीन आप्पा गवळी, केशवआप्पा बिडवे, रामभाऊआप्पा शेटे, मनोहरआप्पा गवळी, आप्पासाहेब बिडकर  उपस्थित होते. महाराष्ट्र विरशैव सभा आणि महात्मा बसवेश्वर स्मारक समितीनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं.

               २५ ऑगस्टला सकाळी मलकापूर येथे लिंगदिक्षा संस्कार, गुरूमंत्र आणि प्रवचन कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी शेकडो लिंगायत बाधवांनी सिद्लिंग शिवाचार्य स्वामींच्या हस्ते लिंगदिक्षा घेतली. दुपारच्या सत्रात त्यांच्या हस्ते समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, मुर्तीजापुरचे आमदार हरीश पिंपळे, नगरसेवक मंगेश काळे यांनी भेटी दिल्यात. 

   २४ ऑगस्टला स्वामीजींचं आगमन झाल्यानंतर दुपारी अंबिकानगर येथून मलकापूरपर्यंत त्यांची स्वागत मिरवणूक आणि कलशयात्रा काढण्यात आली. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यानंतर संध्याकाळी गवळी मंगल कार्यालयात स्वामी महाराजांचं प्रवचन झालं.  २५ ऑगस्टच्या लिंगदिक्षा, गुरूमंत्र कार्यक्रमासाठी विदर्भातील अनेक शहरांसह मध्यप्रदेशातूनही समाजबांधव आले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं.      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश शेटे, ॲड. नितीन गवळी, उमेश अलोणे, सुरेश भागानगरे, राजेश यमगवळी, सुनील डहाके, अजय रुईकर, विलास घुले, आप्पा चुकेवार, आप्पा एकघरे, भास्कर घाटे, सुनील शिरोडकर, सुरज सरजने, नितीन थळकर भारत कारंजकर, संजय बाल्टे, सुरेश सोसे, मनोहर गवळी यांच्यासह सर्व समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Thoughts of Mahatma Basaveshwara mirror of the universe: Siddling Shivacharya Swami Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला