महामार्ग रुंदीकरणासाठी निंबाच्या ९९७ वृक्षांसह हजारो झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 03:50 PM2019-09-09T15:50:52+5:302019-09-09T15:51:10+5:30

राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे.

Thousands of trees slaughtered for highway widening | महामार्ग रुंदीकरणासाठी निंबाच्या ९९७ वृक्षांसह हजारो झाडांची कत्तल

महामार्ग रुंदीकरणासाठी निंबाच्या ९९७ वृक्षांसह हजारो झाडांची कत्तल

Next

- संजय उमक  
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: अंजनगाव, दर्यापूर, मूर्तिजापूर राज्य महामार्ग क्रमांक २८२ रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हिरवीगार महाकाय निंबाच्या ९९७ झाडांची कत्तल करण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वन विभागाकडून त्यासाठी रीतसर परवानगी घेतली असली तरी पर्यावरणाचा ºहास होत आहे.
एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रचंड पैसा खर्ची घालत असताना शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसते. याच पद्धतीने अंजनगाव-दर्यापूर-मूर्तिजापूर या ५२ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाने गती घेतली आहे. रस्त्याचे ७ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. या रुंदीकरणादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व दीड-दोनशे वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या निंबाच्या ९९७ व बाभळीसह हजारो महाकाय वृक्षांची कत्तल करण्यात येत आहे.
कडूलिंबाचा. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुळातील हा वृक्ष असून, त्याचे शास्त्रीय नाव अ‍ॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो. अशा वृक्षतोडीने आता आयुर्वेदात मानाचे स्थान असलेल्या निंबाच्या व बाभळीच्या झाडांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
२०१७-१८ च्या अर्थसंकल्प कार्यक्रमांतर्गत, १३१ कोटी रुपये खर्चून ५२ किलोमीटर बांधण्यात येणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली हजारो झाडे मुळापासून उपटून काढावी लागणार आहे. त्यासाठी झाडांना जमीनदोस्त करण्यासाठी किमान २० लोकांची टीम काम करीत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन्ही बाजूंनी उभी असलेली हजारो झाडे कापण्यासाठी वन विभागाकडे तशी रीतसर परवानगीसुद्धा मागितली आहे. या वृक्षतोडीने प्रवाशांना अथवा वाटसरूंना विसाव्यासाठी एकही झाड शिल्लक राहणार नसल्याने वृक्षप्रेमी वर्गात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडांची लागवड संबंधितांनी करावी व त्याचे संगोपन करून ती मोठी करावी, अशी मागणीही याप्रसंगी होत आहे.


शासनाकडून रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वृक्ष तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहे. यामुळे पर्यावरणाचा प्रचंड ºहास होणार आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. यापूर्वी संबंधित विभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे.
- सतीश अग्रवाल,
पर्यावरणप्रेमी, मूर्तिजापूर

Web Title: Thousands of trees slaughtered for highway widening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.