शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 06:22 PM2019-02-13T18:22:27+5:302019-02-13T18:22:56+5:30
अकोला - शाळा-महाविद्यालय परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आठ विक्रेत्यांवर सिटी कोतवाली पोलिसांनी बुधवारी दुपारी कारवाई केली. या सहाही व्यावसायीकांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द कोटपानुसार गुन्हा दाखल केला आहे.

रजपुत पुरा येथील रहिवासी गोपाल रमेश अग्रवाल याच्यावर कारवाई करीत त्याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर गायगाव येथील रहिवासी विष्णु अजाबराव दांदळे याच्यावरही कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहे.आंबेडकर नगर येथील रहिवासी विक्की गवारगुरु याच्याकडून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.सिंधी कॅम्प येथील रहिवासी शेख जमील शेख अब्दुल याच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. बैदपुरा येथील रहिवासी महेमुद खान सुजाद खान याच्याकडून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नासीर खान हसन खान त्यानंतर अमानखा प्लॉट येथील रहिवासी सुनील जोशी व विश्वास ढोरे यांच्याकडूनही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून त्यांच्याविरुध्द सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कोटपा नुसार कारवाई करण्यात आली आहे.