दिवसभरात तिघांचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह; १९२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 06:21 PM2020-09-29T18:21:05+5:302020-09-29T18:21:14+5:30
तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २२९ झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी अकोला शहर, बार्शीटाकळी व मुर्तीजापूर तालुक्यातील प्रत्येक एक अशा आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २२९ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ६२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७३८० झाली आहे. दरम्यान, १९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १२८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सिंधी कॅम्प येथील नऊ जणांसह, जीएमसी येथील पाच, मोठी उमरी, वानखडे नगर, बाळापूर, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी दोन, रेणूका नगर, डाबकी रोड, गोडबोले प्लॉट, लक्ष्मी नगर, दुबेवाडी, मराठा नगर, मोहोड कॉलनी, न्यु तापडीया नगर, कोठारी वाटीका, भागवत वाडी, खोपरवाडी, मलकापूर, कौलखेड, पिंपळखुटा, पारद, पारस, घुसर, मुर्तिजापूर व दहिहांडा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी मुरारका मेडीकल व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, शिवाजी नगर, किर्ती नगर, सिंधी कॅम्प, आरटीओ रोड, किरोली, निपाणा, शरद नगर, घूसर, आदर्श कॉलनी, जीएमसी, मोठी उमरी, रेणूका नगर, मलकापूर, गिरी नगर व झेडपी कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तिघांचा मृत्यू
मंगळवारी आणखी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये श्रीवास्तव चौक, डाबकी रोड येथील ७५ वर्षीय पुरुष, मुर्तीजापूर तालुक्यातील पारद येथील ५० वर्षीय पुरुष व बार्शीटाकळी येथील ८५ वर्षीय पुरुष या तिघांचा समावेश आहे.
१९२ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ३९, कोविड केअर सेंटर अकोला येथून २२, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, युनिक हॉस्पीटल येथून दोन,अवधाते हॉस्पीटल येथून दोन, अकोला अॅक्सीडेंट क्लिनिक येथून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून एक, होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १२० अशा एकूण १९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
१,४६२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,३८० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५६८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४६२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.