अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून , शनिवार २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२४ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्य ७८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७०९२ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोड येथील सहा, अकोट येथील पाच, अमनखा प्लॉट व बाळापूर येथील प्रत्येकी चार, जीएमसी, खडकी, राऊतवाडी, व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन , पातूर, बोर्डी, सिव्हिल लाईन, वानखेडे नगर, रणपिसे नगर, जवाहर नगर, सिंधी नगर, कौलखेड, वडद, बोरगाव मंजू व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण, खामखेड ता. पातूर, मारोती नगर, स्टेशन रोड, रतनलाल प्लॉट, रामदास पेठ, सुधीर कॉलनी, द्वारका नगरी, कोलंबी, चागेफल, गीरी नगर, आसरा कॉलनी, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट व निमवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी कान्हेरी सरप येथील दोन, मराठा नगर, खोलेश्वर, गड्डम प्लॉट, मोठी उमरी, वाशिम बायपास, वखारीया नगर, जठारपेठ, बार्शीटाकळी व सूकळी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तिघांचा उपचारादरम्यान मृत्यूशनिवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जुने शहर, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष, अकोट फाईल येथील ८४ वर्षीय पुरुष आणि महसूल कॉलनी, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.३६ जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,४९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,०९२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४९७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
दिवसभरात तिघांचा मृत्यू; ७८ नवे पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 6:39 PM