अकोला जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार,१० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 06:14 PM2020-12-02T18:14:32+5:302020-12-02T18:14:39+5:30
Accidents in Akola district तीन अपघातात तीन ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली.
अकोला: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात तीन ठार तर १० जण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
पहिल्या घटनेत अंदुरा-आडसूळ मार्गावर कापसाने भरलेले मालवाहू खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू उलटला. या अपघातात तीन जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. ग्राम हाता येथून कापूस घेऊन जाणारा मीनीडोअर क्रमांक एमएच ०४, जीसी ९४२० क्रमांकाचे वाहन उलटले. तळेगाव-बाभूळगाव येथून कौटुंबिक कार्यक्रम आटोपून शेगावकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच २८, एव्ही ३२८८ दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रल्हाद अडकणे रा. दसरानगर, शेगाव (६०) हे तर मालवाहू वरील दोण जण जागीच ठार झाले आहेत. दुसऱ्या घटनेत राष्ट्रीय महामार्गावर अकोलाहून मुर्तिजापूरकडे जाणारा कंन्टेनर ट्रक क्रमांक जी.जे.१२ बी.एक्स. या वाहनाची ट्रॉली उलटली. रस्त्यावर ट्रॉली उटल्यामुळे मुर्तिजापूरकडे जाणारी कार क्रंमाक एम.एच.३० ए झेड३९४६ व अकोल्याकडे येणारा ट्रक क्रमांक एम.एच.३६ ए.ए.२२१६ यांचा समोरासमोर धडक झाली. या तिहेरी अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. तर तिसऱ्या घटनेत पातूर तालुक्यातील चान्नी-पिंपळखुटा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.