चारचाकी वाहनाची आॅटोरिक्षाला धडक; वाशिम जिल्ह्यातील तीन ठार, पाच जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:32 PM2019-07-20T12:32:19+5:302019-07-20T12:50:46+5:30
एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . यामध्ये पाच जण जखमी आहे.
कुरुम /कामरगाव (अकोला/वाशिम): रुग्णालयातून उपचार करून घरी परतणाऱ्या वाशिम जिल्हयातील कामठ बेलखेड येथील आजी नातवासह ३ जणांचा आॅटो सुमो अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १९ जुलैला रात्री ९ वाजताच्या सुमारास माना पो.स्टे. हद्दीतील कारंजा तालुक्यातील म्हसला गावापासून ७ कि.मी अंतरावरील अकोली गावानजीक घडली. यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . यामध्ये पाच जण जखमी आहे.
वाशिम जिल्हयातील कामठा बेलखेड येथील पांगोळे कुटूंबासह श्रीकृष्ण जांभोळे व त्याची मुलगी भाविका जांभोळे हे माना पो.स्टे हद्दीतील जामठी येथून दवाखाना करून आॅटो क्र. एम.एच. ३७ बी ६७७२ हे आॅटोचालकासह ८ जण घरी जात होते. समोरून येणारी टाटा सुमो क्र. एम.एच.१६ ई ५८८७ ने आॅटोला जबर धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर आजी नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित ५ जखमींना पुढील उपचाराकरिता कामरगाव येथे प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथे हलविण्यात आले. या अपघतात आजी कौशल्याबाई हरिनाथ पांगुळे (५५) , नातू आदित्य विजय पांगुळे (३), श्रीकृष्ण दादाराव जांभोळे (४५) या तिघांचा मृत्यू झाला, तर विजय हरिनाथ पांगुळे (३२), पुनम विजय पांगुळे (२८), प्रज्ञा संतोष पांगुळे (६) , भाविका श्रीकृष्ण जांभोळे (१४), आॅटोचालक गणेश बाबाराव चौके, (३७)े सर्व रा.कामठा बेलखेड हे जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच माना पोलिस घटनास्थळावरून दाखल होवून जखमींना उपचाराकरिता हलविले.
या प्रकरणी माना पो.स्टे. मध्ये आरोपी टाटा सुमो चालक गोविंदा काळे रा.सौदापूर यांच्या विरुद्ध कलम २७९, ३३७, ४४८, ३०४ अ ,१४ , १७७, १८४ एम.व्ही. अ?ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.