अकोला जिल्ह्यातील तीन लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:27 PM2019-12-15T12:27:37+5:302019-12-15T12:28:04+5:30
अकोला जिल्ह्यातील तीन लाख शेतकºयांना या मदतीची प्रतिक्षा आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी १८ हजार रुपये देण्यात येत असलेली मदत तुटपुंजी ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील तीन लाख शेतकºयांना या मदतीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना वाढीव मदत देण्याचा प्रश्न १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाºया राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार की नाही, यासंदर्भात शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
पावसाळा संपल्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात राज्यात पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामध्ये खरीप पिकांसह बागायती आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके अवकाळी पावसाने पळविल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यानुषंगाने गत १८ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली.
त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपये मदत शेतकºयांना देण्यात येत आहे; परंतु पीक नुकसानाच्या तुलनेत शेतकºयांना देण्यात येत असलेली हेक्टरी मदत अत्यंत तुटपुंजी ठरत आहे. त्यानुषंगाने संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी पीक नुकसान भरपाईची वाढीव मदत देण्याचा प्रश्न १६ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाºया राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार की नाही, यासंदर्भात राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
पहिल्या व दुसºया टप्प्यात वितरित अशी आहे मदत!
राज्यातील ३४ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी पहिल्या टप्प्यात २ हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपये मदतीची रक्कम १९ नोव्हेंबर रोजी आणि दुसºया टप्प्यात ४ हजार ५०० कोटी रुपयांची मदत १३ डिसेंबर रोजी शासनामार्फत जिल्हास्तरावर वितरित करण्यात आली आहे.